मंत्रालयातील अधिकारी वर्गाची पदे भरण्यासाठी तातडीने पावलं उचला, विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पटोले यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले आहेत.

मंत्रालयातील अधिकारी वर्गाची पदे भरण्यासाठी तातडीने पावलं उचला, विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 11:34 AM

मुंबई : मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे (vacant posts of officers in Mantralaya) न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहेत. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सूची जारी करुन या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पटोले यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी तयार करुन पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी.

कक्ष अधिकारी पदाच्या 1986 पासूनच्या ज्येष्ठता सुधारीत करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असेही पटोले यांनी सांगितले. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव संजय कुमार यांनी विहित नियामांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

या बैठकीत मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सु. मो. महाडिक, विधी आणि न्याय विभागाचे बु. झ. सय्यद, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव रा. को. धनावडे, उपसचिव टि. वा. करपते, वन विभागाचे अवर सचिव अ. म. शेट्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विष्णू पाटील आदींसह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना ठाकरे सरकारकडून प्रमोशन

मुंबई महानगरपलिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal singh Chahal) यांना राज्य सरकारने बढती दिली आहे. चहल यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी प्रमोशन मिळाले आहे. बढतीनंतरही इक्बालसिंग चहल हे बीएमसीच्या आयुक्तपदी कायम राहतील.

मुंबई महापालिका आयुक्तपदी अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. चहल यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली, तेव्हा ते प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी होते. आता त्यांना अपर मुख्य सचिव श्रेणीत स्थानापन्न पदोन्नती देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिलात सवलत द्या, नाना पटोलेंचे सरकारला निर्देश

नाना पटोलेंनी स्वीकारली सानिकाच्या शिक्षणाची जबाबदारी, वडिलांच्या आत्महत्येनंतरही दहावीत मिळवले यश 

धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?

Fill the vacant posts of officers in the Mantralaya; Nana Patole orders

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.