भयंकरः फटाका अंगावर फुटून सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

फटाके फोडणे एका सात वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले असून, त्याच्यावर आता नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भयंकरः फटाका अंगावर फुटून सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
नाशिकमध्ये फटाके फोडताना सात वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 12:12 PM

नाशिकः फटाके फोडणे एका सात वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले असून, त्याच्यावर आता नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिकच्या इंदिरानगर मधील पांडवनगरीत राहणाऱ्या शौर्य लाखोडे हा सात वर्षांचा मुलगा मित्रांसोबत फटाके फोडत होता. त्यांची रोजप्रमाणेच धमाल मस्ती सुरू होती. ते फटाके पेटवायचे आणि बाजूला फेकायचे. मोठा आवाज व्हायचा. त्यानंतर ही मित्रमंडळी टाळ्या वाजवायची. असा खेळ बराच वेळ रंगला. मात्र, अचानक एका मित्राने फटाका पेटवून बाजूला फेकला. तो नेमका शौर्यच्या अंगावर पडला. त्यामुळे त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. सोबत फटाकाही वाजला. यामुळे शौर्य मोठ्या प्रमाणात भाजला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही परिस्थिती पाहता शौर्यच्या आईने फटाका विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.

फटाके बंदी घेतली मागे

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून फटाके विक्री चर्चेत आहे. कारण राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ योजनेअंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढाकार घेऊन नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दिवाळीत फटाके विक्री करण्यावर बंदी घातली होती. विशेष सभा घेऊन फटाके बंदीबाबत आपआपल्या विभागांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेशही गमे यांनी दिले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय झाल्याने फटाके विक्रेते नाराज झाले होते. शेवटी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला.

गेल्यावर्षी होती बंदी

दरम्यान, नाशिकमध्ये गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर 2020च्या मध्यरात्रीपासून फटाके फोडण्यात बंदी घालण्यात आली होती. फटाके फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. राज्यातील कोरोनाचं संकट अद्यापही गेलेले नाही. त्यातच थंडी वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची चिन्हे आहेत. शिवाय दिवाळीत फटाके फोडल्यास कोरोनाचा संसर्ग आणि वाढण्याची शक्यता असल्याचं सांगत ही फटाके बंदी घालण्यात आली होती.

प्रदूषण वाढण्याची भीती

कोरोनामुळे गेल्यावर्षी नाशिकमध्ये फटाके फोडण्यावर बंदी होती. अपवाद वगळता नाशिककरांनी या बंदीचे पालन केले. त्यामुळे कललेही प्रदूषण झाले नाही. आता या वर्षी मात्र दिवाळी दरम्यान शहरवासीय मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्याची शक्यता आहे. त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रदूषणात वाढ भयंकर वाढण्याची भीती आहे. हे पाहता नागरिकांनी सजग होत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा विडा उचलावा, असे आवाहन शहरातील पर्यावरण प्रेमींनी केले आहे.

शौर्य त्याच्या मित्रासोबत फटाके फोडत होता. यावेळी एका मित्राने फटाका पेटवला आणि तो दूर फेकला. नेमका तो फटका माझ्या लेकराच्या अंगावर पडला. यात तो भाजला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खरे तर सरकारने फटाके विक्रीवर बंदी आणायची गरज आहे. – योगिता लाखोडे, जखमी शौर्यची आई

इतर बातम्याः

हेल्मेट मोहिमेत खोडा घालणाऱ्या पेट्रोल पंपांना नोटीस; नाशिकचे पोलीस आयुक्त आक्रमक

नाशिकमध्ये आजपासून 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अतिवृष्टी अनुदान वाटपात घोळ; निधी येऊनही अतिरिक्त 29 कोटींची मागणी, चौकशीचे लचांड

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.