कराडमध्ये मध्यरात्री गोळीबार, 24 वर्षीय तरुणावर घरात घुसून 6 ते 7 गोळ्या झाडल्या
कराडमध्ये (Karad Firing) मध्यरात्री गोळीबार झाला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. बुधवार पेठेत मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास तब्बल 7 गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
सातारा : कराडमध्ये (Karad Firing) मध्यरात्री गोळीबार झाला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. बुधवार पेठेत मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास तब्बल 7 गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
पवन दीपक सोळवडे (वय 24, रा. बुधवार पेठ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या घराच घसून गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. फिल्मी स्टाईलने झालेल्या गोळीबारात पवनवर सहा ते सात गोळ्या फायर करण्यात आल्या.
मध्यरात्री झालेल्या या थरारामुळे बुधवार पेठ आणि मंडई परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांना लाठीचार्ज करून जमावाला पांगवावे लागले. या गोळाबारीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र गुंडगिरीच्या वर्चस्वाच्या वदातून हा प्रकार झाला असावा असा पोलिसांना संशय आहे.
याप्रकरणी शिवराज इंगवले, समीर मुजावर आणि जुनेद शेख यांच्यासह अन्य दोघांवर पोलिसांचा संशय आहे. त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू होती. या गोळीबाराचं वृत्त कळताच संपूर्ण कराड शहरात मोठ तणाव निर्माण झाला. बुधवार पेठ परिसरात काही ठिकाणी गाड्या जाळणे, दगडफेकीचे प्रकारही झाले.
गुंडगिरीच्या वर्चस्व वादातून गोळीबार झाला असावा असा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, या गोळीबारानंतर आज सकाळी कराड पोलिस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला. पवन सोळवंडे समर्थकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली. आरोपींना खुनासाठी पोलिसांनी मदत केल्याचा आरोप सोळवंडे समर्थकांनी केला.