भारतात कोरोनाचा पहिला बळी, कर्नाटकात 76 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
भारतात 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे (Corona suspected patient dies).
बंगळुरु : कर्नाटकात 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे (Corona suspected patient dies). सुरुवातीला कर्नाटकाच्या आरोग्य विभागाने हे वृत्त फेटाळलं होतं. मात्र, ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार या वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. कर्नाटकाचे आरोग्य विभागाचे आयुक्त मनोज कुमार मीना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे (Corona suspected patient dies). त्यामुळे कोरोनाने भारतात पहिला बळी गेल्याचं स्पष्ट झालं आहे.
Commissioner,Karnataka Health Dept:76-yr-old man from Kalaburagi who passed away&was a suspected COVID-19 patient has been confirmed positive for COVID-19. Contact tracing, isolation&other measures being taken. Telangana Govt. has also been informed as he went to a hospital there
— ANI (@ANI) March 12, 2020
कोरोनामुळे 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती कर्नाटकच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सुरुवातीला हे वृत्त आरोग्या खात्याकडून फेटाळण्यात आलं होतं. मात्र, दोन दिवस तपासणी केल्यानंतर वृद्ध रुग्ण कोरोनाबाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे.
भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत (Corona cases in India) याबाबतची माहिती दिली. देशातील आकडा सत्तरीपार झाला असताना, इकडे महाराष्ट्राती कोरोनाबाधितांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्यांशी संपर्क करुन, दररोज सविस्तर अहवाल मागवत आहे. याशिवाय भारत सरकारकडून परदेशातील भारतीयांनाही मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (Corona cases in India)
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांमध्ये केरळचा पहिला नंबर लागतो. केरळमध्ये आतापर्यंत 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात 14, उत्तर प्रदेशात 10, दिल्ली 6 आणि कर्नाटकात चौघांना कोरोनाची लागण झाली आहे.
संबंधित बातम्या :
Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर
सॅनिटायझर नव्हे, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी साबणच प्रभावी हत्यार
Corona | 15 एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांना भारत बंदी, सर्व व्हिसा रद्द, भारताचा मोठा निर्णय