गृहकर्ज हवंय स्वस्त, मग हा मस्त पर्याय निवाडा
सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकदाच गृहकर्ज घेतो. आटापिटा करुन आणि हातपाय मारुन त्याचं स्वप्नातील घर प्रत्यक्षात येते. त्यामुळे गृहकर्जाच्या दबावाखाली त्यांचा आनंद हिरावू नये यासाठी गृहकर्जातील काही बारकावे त्याची कर्जावरची जादा रक्कम वाचवू शकते.
कोरोना महामारीची भीती कमी झाली तशी घरांची मागणी ही वाढली आहे. भविष्यातील तरतूद म्हणून घर खरेदीकडे कल वाढला आहे. तर दुसरीकडे गृहकर्जावरील व्याज दर सध्या सर्वाधिक निचांकी स्तरावर पोहचले आहेत. त्यामुळे घर खरेदीचा मुहुर्त गाठण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये. मार्केट एक्सपर्टही घर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.
घर खरेदी करताना सर्वात अगोदर आपल्या समोर येत ते म्हणजे व्याजदर आणि ईएमआय (EMI) गणित. या दोघांचा घरा खर्चाशी सांगड घालण्याचा सर्वसामान्य माणूस कसरत करतो. गृहकर्ज दीर्घ कालावधीसाठी चुकवावे लागत असल्याने सर्व खर्चाचा तोंडमेळ घालणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे ग्राहकाची जमाखर्च करताना त्रेटात्रिपट उडत नाही. त्यासाठी गृहकर्ज घेताना व्याजदर आणि ईएमआय सोबतच इतर पर्यांयाचा विचार करणे आवश्यक आहे. एक चांगली डिल करण्यासाठी या काही उपयुक्त टीप्स
गृहकर्ज खरेदी करताना निश्चित व्याज दर (Fixed Interest Rate) चांगला राहिल की तरल अर्थात बदलता व्याजदर ( Floating Interest Rate) योग्य राहिल याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यावरच तुमच्या भविष्यातील खर्चाचे गणित अवलंबून असते. या दोन्ही पर्यायातील योग्य पर्याय कोणता जो तुमच्या खिशावरील ताण वाचवेल याचा विचार करणे गरजेचे आहे. या दोन्ही पर्यायातील एकाचा निवड तुमच्यासाठी मदतीची ठरणार आहे.
निश्चित व्याजदर
निश्चित व्याजदरावर बाजारातील बदलाचा कुठलाही परिणाम दिसून येत नाही. गृहकर्ज घेताना व्याजदर निश्चित असतो. कर्ज कालमर्यादा जोपर्यंत आहे, तोपर्यंत हाच निश्चित व्याजदर लागू असतो. त्याआधारेच तुम्हाला बँक कर्जावरील व्याज आकारते. याचा सरळसरळ परिणाम तुमच्या ईएमआयवर दिसून येतो. कारण मासिक हप्ता हा ठरलेला असतो. कर्जावर ठरवून दिलेला मासिक हप्ता असतो, तो शेवटपर्यंत बदलत नाही. व्याजदर स्थिर राहिल्यास तुम्हाला अधिकची रक्कम जमा करुन मुळ रक्कमेत जमा करण्याची मूभा ही मिळविता येते.
लक्षात ठेवा, निश्चित व्याजदराची रक्कम बदलत्या व्याजदरापेक्षा अधिक असते
गरज ओळखून निश्चित व्याजदर की तरल व्याजदर यापैकी एक पर्याय निवडा
दोघांमध्ये जास्त अंतर नसेल आणि भविष्यातही फारसा बदल नसेल तर एक पर्याय निवडा
व्याजदर अत्यंत कमी असेल तेव्हा निश्चित व्याजदराचा पर्याय योग्य ठरतो
बदलते व्याजदर
बदलते अथवा तरल व्याजदर हे बाजारानुरुप असते. बाजारातील तेजी-मंदीचा, चढ-उताराचा थेट परिणाम या व्याजदरावर दिसून येतो. बाजारातील परिस्थितीनुसार व्याजदर कमी-जास्त होते. या पर्यायात ग्राहकाला ईएमआय किती असेल याचा अंदाज बांधता येत नाही. कारण तो परिस्थितीनुसार बदलतो. यातील सर्वात मोठा दोष म्हणजे व्याजदर सतत वाढत असेल तर तुमच्या खिशावर ताण पडतो आणि कदाचित तुम्हाला कर्ज कालावधी ही वाढून घ्यावा लागतो.
व्याजदर कमी असताना हा पर्याय निवडा
रिअल इस्टेटमधील तज्ज्ञांच्या मते फ्लोटिंग इंटरसेट रेट स्वीकारणे योग्य ठरते
हा पर्याय निवडल्यास तुम्हाला कर्ज रक्कमेत पार्ट प्रीमेमेंट अथवा फोरक्लोजर करताना अर्थात मुदतीपूर्व कर्ज रक्कम चुकता करताना कुठलेही शुल्क आकारले जात नाही.
हा पर्याय निवडला असेल आणि व्याजदर कमी होताना हप्त्यावरील वाचलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास त्यातूनही ग्राहकाला कमाई होऊ शकते
एकत्रित पर्याय
निश्चित अथवा बदलते व्याजदर याबाबत तुम्ही साशंक असाल तर तिसरा पर्यया अर्थात या दोन्ही व्याजदरांचे एकत्रिकरणाचा आहे. या पर्यायामध्ये तुम्हाला अर्धी रक्कम निश्चित स्वरुपात तर अर्धी रक्कम बदलत्या व्याजदराआधारे चुकता करते येते. अर्थात हा पर्याय कितपत योग्य राहिल हे सांगणे अवघड आहे. तसेच निश्चित व्याजदराचा पर्याय तुम्ही बदलत्या व्याजदरासोबत एक्सचेंज म्हणजे बदलवू शकता. पण त्यासाठी शुल्क आकारले जाते. तुमची आर्थिक स्थिती, कमाईची साधने आणि अनुषंगिक खर्च याचा अंदाज बांधून तुम्हाला कर्जावरील व्याज भरण्याचा पर्याय निवडावा लागतो.
संबंधित बातम्या :
GDP मीटर : नव्या व्हेरियंटची मार्केटला धास्ती, अर्थचक्राच्या गतीला ‘ओमिक्रॉन’मुळं ब्रेक?
गृहकर्ज हस्तांतरण करणे बचतीचे आणि फायदेशीर, ‘अशी’ आहे एसबीआयची व्यवहारिक आकडेमोड