Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती बिघडली, आयसीयूत दाखल

तरुण गोगोई यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टरांची एक विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे (Tarun Gogoi oxygen level drops).

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती बिघडली, आयसीयूत दाखल
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 12:46 AM

गुवाहाटी : आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांची प्रकृती गुरुवारी (24 सप्टेंबर) अचानक जास्त बिघडली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं (Tarun Gogoi oxygen level drops).

तरुण गोगोई यांना 26 ऑगस्ट रोजी गुवाहाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर उपचारानंतर काही दिवसांनी त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतरही गुवाहाटीच्या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत (Tarun Gogoi oxygen level drops).

तरुण गोगोई यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टरांची एक विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे. या टीमच्या निगराणीखाली गोगोई यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिपुन बोरा यांनी गुवाहाटी रुग्णालयात जाऊन गोगोई यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

तरुण गोगोई आसाम राज्याचे 2001 ते 2016 असे सलग 16 वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना 26 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या शरीरातील ऑक्सिनची पातळी घसरली होती. त्यानंतर ऑक्सिजनची पातळी सुधारली होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

हेही वाचा : प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.