वैजापूरचा लोकनेता हरपला, नांदूर मध्यमेश्वर कालव्याचे जनक आर.एम. वाणी यांचे निधन

औरंगाबादमधल्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, औरंगाबादचे संपर्कमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सतार,माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींनी शोक व्यक्त केला.

वैजापूरचा लोकनेता हरपला, नांदूर मध्यमेश्वर कालव्याचे जनक आर.एम. वाणी यांचे निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार आर.एम. वाणी यांचं निधन
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 6:10 PM

औरंगाबाद: वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे (Vaijapur  constituency) माजी आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रंगनाथ मुरलीधर ऊर्फ आर.एम. वाणी (R.M. Vani) यांचे मंगळवारी रात्री औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. वैजापूर मतदार संघात तीन वेळा आमदारकी भूषवताना त्यांनी असंख्य विकासाची कामे करत जनसामान्यांच्या मनात महत्त्वाचे स्थान मिळवले होते.  31 ऑगस्ट रोजी मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, (Uddhav Thackeray ) औरंगाबादचे संपर्कमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सतार,माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींनी शोक व्यक्त केला.

एकाच मतदारसंघात 15 वर्षे आमदारकी

शिवसेनेचे लोकप्रिय नेते असलेल्या आर.एम. वाणी यांनी एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून तब्बल पंधरा वर्षे म्हणजेच1999 ते 2014 पर्यंत आमदारकी भूषवली. या काळात त्यांनी विविध विकासाची कामे हाती घेतली. तसेच महाराष्ट्र विधानसभेवर असताना त्यांनी अनेक जनकल्याणाचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले. शहरासह व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी,सिंचन प्रकल्प,कृषी विकास, आरोग्य, सहकार, शैक्षणिक, सामाजिक प्रश्नावर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करत प्रामाणिक भूमिका बजावली. गेल्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाणी यांनी स्वतःहून आमदारकीचं तिकिट नाकारलं होतं. आता इतरांना संधी मिळावी, असं शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांनी कळवलं होतं.

अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय, बाजारपेठ बंद

वैजापूर येथील येवला रोडवरील निवासस्थानावरून आर.एम. वाणी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या जनसमूदायाची उपस्थिती होती. लोकांच्या मनात स्थान मिळवलेल्या या नेत्याच्या निधनामुळे वैजापूरमधील व्यापाऱ्यांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेवली होती. अंत्यसंस्कारा वेळी महसूल व ग्रामविकास  राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, आ.रमेश बोरनारे, आ.उदयसिंह राजपूत, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे, माजी आ.भाऊसाहेब चिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आदी नेते उपस्थित होते.

आरएम यांना शिक्षणाविषयी खूप तळमळ – आ.  चव्हाण

आमदार सतीश चव्हाण यांनी आर.एम. वाणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “माझे व त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. विविध विषयांवर त्यांच्याकडून मला नेहमीच मार्गदर्शन मिळत असे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सदस्य असल्याने अनेक वेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी असलेली तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले. एक शांत, संयमी, विनम्र व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. स्व.आर.एम.वाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!” ( former MLA of Vaijapur RM Vani passed away in Aurangabad hospital Maharashtra)

इतर बातम्या: 

शिवसेनेचा नागपुरातील बडा नेते राष्ट्रवादीत, मुंबईत हालचालींना वेग, माजी पदाधिकाऱ्याला तातडीचं बोलावणं

दहीहंडी किंवा श्रीकृष्ण हा काय राजकीय अजेंडा आहे का? बाळा नांदगावकरांचा गृहमंत्र्यांना सवाल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.