कुत्र्यांवर खरुज रोगाचं थैमान, संसर्गजन्य रोगामुळे माणसांनाही लागण

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील वारा जहांगीर येथे गेल्या काही महिन्यापासून कुत्र्यांना खरुज (Fungale Diseases) या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्यात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन लागण झालेल्या कुत्र्यांवर वेळीच उपचार करुन उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्यातील वारा […]

कुत्र्यांवर खरुज रोगाचं थैमान, संसर्गजन्य रोगामुळे माणसांनाही लागण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील वारा जहांगीर येथे गेल्या काही महिन्यापासून कुत्र्यांना खरुज (Fungale Diseases) या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्यात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन लागण झालेल्या कुत्र्यांवर वेळीच उपचार करुन उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे.

वाशिम जिल्ह्यातील वारा जहागीर या गावात मागील अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांवर खरुज रोगाने थैमान घातले आहे. या रोगामुळे अंगावरील केस गळून जात असून त्वचा लालसर,काळसर व कोरडी पडत आहे. गावातील शेकडो भटके कुत्रे जागोजागी दिसून येत आहेत. हा रोग संसर्गजन्य असल्याने नागरिकांना या रोगाची लागण होत आहे. आतापर्यंत अनेक जणांना याची बाधा झाली असून काही वयोवृद्धांना त्वचारोगामुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागत असल्याचं नागरिक सांगत आहेत.

वारा जाहिगीर इथून उपचारासाठी वाशिमला जावं लागत आहे. गोरगरिबांना परिस्थितीनुसार कठीण होत असल्यामुळे गावातील नागरिकांच्या या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष्य देऊन गावातील असलेलं उपकेंद्र सुरु करुन उपचाराची सुविधा करावी अशी मागणी सरपंचांनी केली आहे.

वारा जहागीर या गावात मागील दोन महिन्यांपासून कुत्र्यांना खरुज या रोगाची लागण झाली आहे. या भयानक रोगांमुळे अनेक भटके कुत्रे मृत्यूमुखी पडले आहेत. खाजेमुळे हैराण झालेले आणि त्वचेवर ठिकठिकाणी जखमी झालेले कुत्रे घरामध्ये घुसण्याचा, पाण्यात, डोहात बुडून बसण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कुत्र्यांच्या खरुज रोगाची बाधा नागरिकांना होत असल्याने अंगाला खाज सुटलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन या बाधित कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.