‘ऑस्ट्रेलियाच्या राजा’चं थाटामाटात आगमन, देशाबाहेरील सर्वात मोठा उत्सव

ऑस्ट्रेलियात ढोल-ताशांच्या गजरात गणरायाच्या आगमनाची भव्य मिरवणूक निघाली (Ganeshotsav 2020 celebration in Australia).

'ऑस्ट्रेलियाच्या राजा'चं थाटामाटात आगमन, देशाबाहेरील सर्वात मोठा उत्सव
Follow us
| Updated on: Aug 22, 2020 | 9:36 AM

सिडनी (ऑस्ट्रेलिया) : कोरोनामुळे राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधनं आली आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियात सार्वजनिक गणेशोत्सव जोरात साजरा केला जातोय. ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड शहरात युनायटेड इंडियन ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया ही संघटना दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करते. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी तीन वर्षापूर्वीच लालबाग येथून बाप्पाची चौदा फुटाची मूर्ती ऑस्ट्रेलियात आणण्यात आली होती (Ganeshotsav 2020 celebration in Australia).

‘ऑस्ट्रेलयाचा राजा’ या नावाने साजरा होणारा हा देशाबाहेरील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. गेल्यावर्षी या उत्सवात 12 हजार गणेश भक्तांनी हजेरी लावली होती. हे या उत्सवाचे पाचवे वर्ष आहे (Ganeshotsav 2020 celebration in Australia).

सध्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलिया सरकारने ‘कोव्हीड 19 मॅनेजमेंट प्लॅन’ तयार केला आहे. या प्लॅनअंतर्गतच अ‍ॅडलेड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने या उत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ऑनलाईन विनामुल्य रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे.

या गणेशोत्सवाच्या आयोजनाचा आरोग्य तसेच अपघात विमा उतरवण्यात आला आहे. जवळपास वेगवेगळ्या 20 समित्यांवर आयोजनाची जबाबदारी आहे. सोशल डिस्टन्सिंगसह जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सूचनांचे पालन याठिकाणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सर्दी-तापाची प्रतिबंधात्मक लस टोचण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियातील टायटेनिअम सिक्युरिटी एरिना या भव्य इनटोअर स्टेडियममध्ये दोन दिवस हा उत्सव पार पडणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची पालखी निघणार आहे. पारंपरिक पोषाखात लेझीमचे सादरीकरण ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर केले जाईल. ऑस्ट्रेलियातील नेते कलाकारांसह, स्थानिक अनेक विदेशी पाहुणे हजेरी लावतील.

‘ऑस्ट्रेलियाच्या राजा’ची महाआरती आकर्षणाची केंद्रबिंदू असते. या ठिकाणी 101 जोडप्यांच्या उपस्थितीत सत्यनारायण महापुजा केली जाणार आहे. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष जपाचं पठणदेखील केलं जाणार आहे.

गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकास प्रसादासह झाडांचे रोप भेट देण्यात येईल. दोन्ही दिवस येणाऱ्या प्रत्येक भक्तास मोफत महाप्रसादाचा लाभ घेता येईल.

संबंधित बातम्या :

राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात, लाडक्या बाप्पाचं साधेपणाने आगमन

मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, सामाजिक भान ठेवून शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.