चिमुकलीच्या डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, अमिताभ बच्चनकडून कौतुकाचा वर्षाव!
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये चिमुकली एका हरियाणी गाण्यावर छान डान्स करत आहे.
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये चिमुकली एका हरियाणी गाण्यावर छान डान्स करत आहे. चिमुकली वयाने लहान असली तरी तिचा डान्स खूप भारी आहे. अडीच मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अमिताभ बच्चनने देखील या चिमुकलीचे कौतुक करून व्हिडीओ शेअर केला आहे. (Girl Dance Appreciation From Amitabh Bachchan)
T 3696 – Untrained talent .. simply astounding ?? !! Jutti nikal gai but the show must go on .. !! ??? pic.twitter.com/kluDypLpDe
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 20, 2020
महानायकाला चिमुकलीचे कौतुक!
व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन लिहितात, ‘…शो मस्ट गो ऑन!’ चिमुकली डान्समध्ये एवढी मग्न झाली आहे की, डान्स करताना चप्पल पायातून निघाली, तरी चिमुकली तिचा डान्स थांबवताना दिसत नाही. डान्स करताना चिमुकलीचे चेहऱ्यावरील हावभाव, कंबरेचे ठुमके आणि डान्स करण्याची ताकद पाहुण अमिताभ बच्चन यांनी तिचे कौतुक केले आहे. अमिताभ बच्चननी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 7 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. व्हिडीओ अजूनही व्हायरल आहे आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे.
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात, अनेक प्रसंगी ते चाहत्यांना प्रोत्साहित करतानाही दिसतात. अमिताभ बच्चन त्यांच्या सर्व चाहत्यांच्या संपर्कात देखील असतात. एखादा चाहता काही प्रकारचे उत्कृष्ट काम करत असेल, तर अमिताभ बच्चन स्वत: सोशल मीडियावर शेअर करतात. एखाद्या चाहत्याने चांगला व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला की अमिताभ बच्चन त्यांचे कौतुक करतात. त्यावेळी त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून जाते. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. जी अतिशय मधुर आवाजात गात होती. त्याही व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात व्यस्त आहेत. या शो व्यतिरिक्त, अमिताभ ‘पृथ्वीराज’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत.
संबंधित बातम्या :
HappyBirthdayBigB: ‘जया यांनी रेखांना डिनरला बोलावलं आणि…’, अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातले 8 मजेदार किस्से
(Girl Dance Appreciation From Amitabh Bachchan)