नवी दिल्ली : शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सराफा बाजारातही (Gold bullion market price) याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. सराफा बाजारात सोन्याचा भाव (Gold price updates) आज 38 38 रुपयांनी वधारला असून आताची किंमत 10,866 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने यासंबंधी माहिती दिली आहे. सराफा बाजारात आधी सोन्याचे दर 10 ग्रॅम 48477 रुपयांवर होते. पण आज सेन्सेक्स 487 अंकांनी वाढले आणि 49269 च्या अखेरच्या उच्चांकावर बंद झाले. (gold Latest Price up 389 rupees and silver gains by 1137 on 11 january)
आजच्या तुलनेत चांदीच्या किंमती (Silver price updates) 1,137 रुपयांनी वाढून 64,726 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचल्या आहेत. मागच्या व्यापार सत्रामध्ये प्रतिकिलो 63,589 रुपयांवर चांदी होती. पण आता त्यामध्ये वाढ झाली आहे. होते. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 24 पैशांची घसरण झाल्याचं दिसून आलं. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, “कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या चिंतेमुळे सोन्याची खरेदी वाढली असून डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारच्या खाली बंद पातळीवर आला.”
MCX वरील सोने आणि चांदीचे दर
सोन्याच्या डिलिव्हरी भावातही मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. एमसीएक्सवर संध्याकाळी 7.10 वाजता फेब्रुवारीच्या सोन्याचा भाव 86 रुपयांनी घसरून 48881 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. इतकंच नाही तर एप्रिलमधील डिलीव्हरीच्या सोन्यामध्येही 102 रुपयांनी घसरून होऊन 48910 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर मार्केट बंद झालं.
आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहेत सोने-चांदीचे भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये किंचतच वाढ झाली आहे. इन्व्हेस्ट डॉट कॉमवर फेब्रुवारीत सोन्याचे 0.70 डॉलकच्या तेजीसह 1836.20 डॉलर प्रति दर औंस होते. यावेळी चांदीमध्ये तेजी दिसून आली. मार्चमधील चांदीची किंमत 0.23 डॉलरने वाढून 24.87 डॉलर प्रति औंस पातळीवर होती. (gold Latest Price up 389 rupees and silver gains by 1137 on 11 january)
संबंधित बातम्या –
सॉवरेन गोल्डमध्ये स्वस्तात करा गुंतवणूक आणि मिळवा जास्त रिटर्न, ‘ही’ आहे शेवटची तारीख
सोनं स्वतात खरेदी करा! RBI कडून डिजिटल पेमेंटवर खास ऑफर
(gold Latest Price up 389 rupees and silver gains by 1137 on 11 january)