तू सफर मेरा, है तू ही मेरी मंज़िल…सोनं पुन्हा महाग होतंय, जाणून घ्या नाशिकमधले भाव!

अनेकांच्या जीवनात गुंतवणुकीचा साथी असणारे, अनेकाअनेकांना प्रिय असणाऱ्या सोन्याचे भाव दसऱ्यानंतर वाढताना दिसून येत आहेत.

तू सफर मेरा, है तू ही मेरी मंज़िल...सोनं पुन्हा महाग होतंय, जाणून घ्या नाशिकमधले भाव!
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 3:06 PM

नाशिकः अनेकांच्या जीवनात गुंतवणुकीचा साथी असणारे, अनेकाअनेकांना प्रिय असणाऱ्या सोन्याचे भाव दसऱ्यानंतर वाढताना दिसून येत आहेत. नाशिकच्या सराफा बाजारात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48880 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 45640 रुपये नोंदवले गेले.

नाशिकच्या सराफा बाजारात 1 सप्टेंबर रोजी चोवीस कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या नंतर या दरात घसरणच पाहायला मिळाली. मात्र, आता या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48870 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 45630 रुपये नोंदवले गेले. शुक्रवारी यात किरकोळ वाढ होत 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48880 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 45640 रुपये नोंदवले गेले. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

गुंतवणुकीस प्राधान्य

नाशिकच्या सराफा बाजारात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात मोठी उलाढाल झाली. अनेकांनी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीस प्राधान्य दिले. दसऱ्याचा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. या दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल नाशिकमध्ये झाली. आता काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. दिवाळीच्या पाडव्यादिवशी अनेकजण सोने खरेदी करायला प्राधान्य देतात. दिवाळीच्या चारी दिवसांतही सराफा बाजारात मोठी गर्दी असते. ते पाहता आता व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दिवाळी सणाकडे लागले आहेत. सोबतच येत्या काळात सोन्याचे भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आता जोखीम संपली

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्करावी लागणार नाही.

इतर बातम्याः

गोदाकाठच्या 100 मीटर परिसरात नो प्लास्टिक झोन; नाशिक महापालिकेचा निर्णय

कार्यालयात हेल्मेटशिवाय प्रवेश नाही; नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांची अनोखी मोहीम

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.