Pakistan Gold Rate: पाकिस्तानमध्ये सव्वा लाखाला तोळाभर सोनं, यूक्रेन-रशिया युद्धाचा इफेक्ट, इम्रान खानची खुर्चीही धोक्यात
कोविड प्रकोप, रशिया-युक्रेन वाद यामुळं गुंतवणुकदारांत मोठ्या प्रमाणात अस्थिरता होती. त्यामुळे भारतातील दिल्लीसह देशातील प्रमुख सोने बाजारात सोन्यानं सर्वोच्च भावाचा टप्पा गाठला होता.
नवी दिल्लीः सोन्याच्या भावात तेजी-घसरणीचं चित्र कायम असतं. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून जगभरातील गुंतवणुकदार सोन्याला पसंती देतात. कोविड प्रकोप, रशिया-युक्रेन वाद (RUSSIA-UKRANE CRISIS) यामुळं गुंतवणुकदारांत मोठ्या प्रमाणात अस्थिरता होती. त्यामुळे भारतातील दिल्लीसह देशातील प्रमुख सोने बाजारात (INDIA GOLD RATE) सोन्यानं सर्वोच्च भावाचा टप्पा गाठला होता. गेल्या वर्षी प्रति तोळा 58 हजारांचा भाव सोन्याला मिळाला होता. भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तानात सोन्याच्या (PAKISTAHN GOLD RATE) भावाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सोन्यानं सर्वोच्च भावाचा टप्पा गाठला आहे. आज (सोमवारी) पाकिस्तानात प्रति 10 ग्रॅम सोन्याला 107770 रुपये आणि प्रति तोळा सोन्याला 125700 रुपये भाव मिळाला.
कराची ते पेशावर, गोल्डन डंका:
पाकिस्तानातील कराची सुवर्ण बाजार सोने खरेदी-विक्रीसाठी जगात प्रसिद्ध आहे. पाकिस्तानातील सोन्याच्या किंमती ठरविण्यासाठी अन्य शहरे कराची सुवर्ण बाजार असोसिएशनच्या भावाचा आधार घेतात. दरम्यान, कराची सहित लाहोर, इस्लामाबाद, पेशावर आणि कतार शहरासाठी सोन्याचा भाव समान दिसून आला.
24 कॅरेट सोन्याचा भाव
• प्रति तोळा- 125700 रुपये • प्रति 10 ग्रॅम- 107770 रुपये • प्रति ग्रॅम- 10777 रुपये
22 कॅरेट सोन्याचा भाव
• प्रति तोळा-115224 रुपये • प्रति 10 ग्रॅम-98788 रुपये • प्रति ग्रॅम-9879 रुपये
रशिया-युक्रेन वादाचा तडका:
अर्थजाणकरांनी पाकिस्तानमध्ये वाढलेल्या भावाला रशिया-युक्रेन वादाची किनार असल्याचे म्हटले आहे. रशिया-युक्रेन वादामुळे अमेरिका-चीनच्या व्यापारी धोरणांवर मोठा परिणाम झाला आहे. चीनने पाकिस्तानातील महत्वाच्या प्रकल्पांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचा दर गेल्या काही दिवसांत उंचावला आहे. पाकिस्तानचे गुंतवणूक क्षेत्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.
गंगाजळीत खडखडाट!
पंतप्रधान इम्रान खान सरकारने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय गंगाजळीतील खडखडाट कमी करण्यासाठी सुवर्ण मार्ग अंमलात आणण्याची शक्यता आहे. स्वत:च्या नागरिकांकडून बिस्किट आणि बार खरेदी करणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तानने द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कर्जदारांकडून 5 बिलियन अमेरिकन डॉलरचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गंगाजळीत मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय डॉलरची तूट निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या
रघुनाथ कुचिक प्रकरणाला वेगळेवळण ; कुचिक यांच्या मुलीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार ; काय केली मागणी?