PHOTO : जगातील सात आश्चर्य पेन्सिलमध्ये, लीडवर कोरीव कामांची कलाकृती
गोंदियातील एका अवलियाने जगातील सात आश्चर्य पेन्सिलच्या लीडमध्ये कोरली आहे. (Gondia Pencil Art Dipesh Sonawane 7 Wonders of the World)

- गोंदियातील एका अवलियाने जगातील सात आश्चर्य पेन्सिलच्या लीडमध्ये कोरली आहे. सध्या या पेन्सिलच्या मायक्रो आर्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.
- एका पेन्सिलच्या लीडवर कोरीव काम करून सुंदर अशी कलाकृती त्याने निर्माण केली आहे.
- ताजमहाल, पेट्रासिटी, ग्रेट वॉल ऑफ चायनासह जगातील सर्वात उंच पुतळा समजला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्याने या पेन्सिल आर्टमध्ये कोरला आहे.
- त्याच्या या कलाकृतीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
- दीपेशला इयत्ता सातवीपासून हा छंद असल्याचं त्याचं वडिलांचं म्हणणं आहे. दिपेशला दोन बहिणी आहेत.
- गोंदियातील सोनेवाने कुटुंबात कलाकारांची अजिबात कमी नाही. त्यांच्या या कलाकृतीची दखल गोंदियात सर्वजण घेत आहेत.
- त्याची मोठी बहीण ही उत्कृष्ट चित्रकार आहे. तर दुसरी बहीण टाकावू वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करते.