6 महिन्यानंतर आली Good News, देशात पुन्हा एकदा निर्यातीमध्ये वाढ

कोरोनाच्या या कठीण (Coronavirus Crisis) काळात देशाची निर्यात (Export) गेल्या ६ महिन्यांपासून ढासळली होती. पण आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

6 महिन्यानंतर आली Good News, देशात पुन्हा एकदा निर्यातीमध्ये वाढ
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 12:05 PM

नवी दिल्ली : देशात जीवघेण्या अशा कोरोनाच्या संसर्गामुळे हाहाकार माजला असताना या सगळ्यात एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या या कठीण (Coronavirus Crisis) काळात देशाची निर्यात (Export) गेल्या ६ महिन्यांपासून ढासळली होती. पण आता सप्टेंबर 2020 मध्ये देशात 5.27 टक्क्यांनी निर्यात वाढली आहे आणि ही 27.4 अरब डॉलरवर पोहोचली आहे. याचवेळी देशात आयातीमध्ये (Import) 19.6 टक्क्यांनी घट झाली असून सध्या ती 30.31 अरब डॉलरवर पोहोचली आहे. यामुळे सप्टेंबर 2020 मध्ये देशाचा व्यापार घाटा (Trade Deficit) कमी होत 2.91 अरब डॉलरवर पोहोचला आहे. (good news exports increased gold import decreased in September 2020)

सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात निम्म्याहूनही झाली कमी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2019मध्ये देशाचा व्यापार घाटा 11.67 अरब डॉलर इतका होता. सप्टेंबर 2020 मध्ये सोन्याच्या आयातीत जबरदस्त अशी 52.85 टक्के घसरण झाली. खरंतर, कोरोनाच्या संकटात सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे आयातीत घट झालेली पाहायला मिळाली. यावेळी निर्यातीवरही मोठ्या परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. पण आता आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे मागणीही हळूहळू वाढत आहे. यामुळे भारत सध्या जागतिक व्यापारामध्ये आपली भागीदारी वाढवण्यासाठी अधिक काम करत आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये सप्टेंबर 2019 च्या तुलनेत अन्नधान्याच्या निर्यातीत 304.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आयातामध्ये झाली घट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजे एप्रिल-सप्टेंबरच्या दरम्यान, निर्यामतीमध्ये 21.43 टक्क्यांनी घसरण झाली. ती सध्या 125.06 अरब डॉलर इतकी आहे. हेच पहिल्या सहामाहीत आयात 40.06 टक्के घसरत 148.69 अरब डॉलर होती. भारताने सप्टेंबर 2020 मध्ये निर्यात वाढवत कच्च्या तेलाची 109.52 टक्के, तांदूळ 92.44 टक्के, तेलाच्या कंपन्या 43.90 टक्के आणि कार्पेटच्या निर्यातमध्ये 42.89 टक्के वाढ झाल्याचं नोंदवलं गेलं आहे. तक चांदीच्या आयातीमध्ये 93.92 टक्क्यांनी घसरण आली होती. याव्यतिरिक्त कच्चा कापूस आणि वेस्टे 82.02 टक्के, न्यूज प्रिंट 62.44 टक्के, सोनं 52.85 टक्के आणि ट्रान्सपोर्ट उपकरणं 47.08 टक्क्यांनी कमी आयात केली गेली आहेत. (good news exports increased gold import decreased in September 2020)

भारतात या वस्तूंच्या निर्यातीत झाली वाढ फार्मा निर्यातीमध्ये 24.36 टक्के, मांस, डेअरी आणि पॉल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीमध्ये 19.96 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचवेळी तंबाखूच्या निर्यातीमध्ये 11.09 टक्के, पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीमध्ये 4.17 टक्के, इंजिनिअरिंग सामानात 3.73 टक्के, रसायन 2.87 टक्के आणि कॉफीच्या निर्यातीमध्ये 0.79 टक्के वाढ झाली आहे.

इतर बातम्या – 

COVID Test | रिलायन्सची नवी RT-PCR टेस्ट किट, दोन तासात कोरोनाचा अहवाल कळणार

Maharashtra Corona Update | राज्यात आज कोरोनाचे 15 हजार 591 नवे रुग्ण

(good news exports increased gold import decreased in September 2020)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.