गुगल फोटोजमधून फोटो हटवा, फोनमध्ये सेव्ह राहतील, नवे फीचर जाणून घ्या
गुगल फोटोजमध्ये आपले सगळे फोटो सेव्ह असतात. पण आता गुगल फोटोजमध्ये एक नवीन फीचर येत आहे. या फीचरचे नाव "अनडो डिव्हाइस बॅकअप" असे आहे. या फीचरमुळे युजर्स आपल्या गुगल फोटोजमधून फोटो आणि व्हिडिओ डिलीट करू शकतात. आता हे फीचर कसे वापरायचे, तुमच्या फोनमध्ये फोटोज कसे राहतील, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आता गुगल फोटोजमध्ये एक नवीन फीचर येत आहे. या फीचरचे नाव “अनडो डिव्हाइस बॅकअप” असे आहे. या फीचरमुळे युजर्स आपल्या गुगल फोटोजमधून फोटो आणि व्हिडिओ डिलीट करू शकतात. हे सर्व फोटोज आण व्हिडिओज तुमच्या फोनमध्ये असतील, पण हे कसं शक्य होईल, याविषयी विस्ताराने जाणून घ्या. गुगल फोटोज अॅप हे अतिशय उपयुक्त अॅप आहे. हे अॅप युजर्सना युजर्सना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ मॅनेज करण्यास परवानगी देते. हे गुगलचे इन-हाऊस अॅप आहे. हे गुगलनेच तयार केले आहे. या अॅपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, जे युजर्ससाठी खूप उपयुक्त आहेत.
आता गुगल फोटोजमध्ये एक नवीन फीचर येत आहे. या नव्या फीचरचे नाव “अनडो डिव्हाईस बॅकअप”. या फीचरमुळे युजर्स आपल्या गुगल फोटोजमधून फोटो आणि व्हिडिओ डिलीट करू शकतात, पण ते तुमच्या फोनमध्येच राहतील. त्याविषयी सविस्तर माहीती घेऊया…
जेव्हा आपण आपल्या गुगल फोटो बॅकअपमधून फोटो आणि व्हिडिओ डिलीट करू इच्छित असाल. तसेच हे सर्व फोटो आणि व्हिडिओ आपल्या फोनमध्ये ठेवण्याचा विचार करत असाल तेव्हा हे फीचर तुम्हाला उपयोगी येवू शकते. मात्र, एकदा तुम्ही तुमचा गुगल फोटोज बॅकअप डिलीट केला की, त्या डिव्हाईसवर बॅकअप आपोआप बंद होईल, असं गुगलचं म्हणणं आहे.
फीचर वापरण्यासाठी काय करावे?
नवीन Undo device backup फीचर वापरण्यासाठी गुगल फोटोज अॅप ओपन करा, वरच्या उजव्या कोपऱ्यातून तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा. त्यानंतर ” Google Photos settings” वर जा आणि “Backup” क्लिक करा.
त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि “Undo backup for this device” बटणावर टॅप करा आणि बॉक्सवर टिक करा I”Delete Google Photos backup” बटणावर क्लिक करा.
हे फीचर फक्त आयओएस युजर्ससाठी रोलआउट केले जात आहे. लवकरच ते अँड्रॉइडवरही उपलब्ध होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
नुकतेच गुगलने एक नवीन अपडेट पेज सादर केले आहे. यामुळे युजर्सला शेअर केलेल्या अल्बममध्ये नवीन अॅक्टिव्हिटी पाहणे सोपे झाले आहे. कंपनी एका नवीन फीचरवर ही काम करत आहे हे युजर्सना AI ने एडिट केलेल्या इमेजबद्दल सांगेली
एक लक्षात असू द्या की कोणताही प्रयोग करताना तुमचे सगळे फोटो एखाद्या छोट्या चुकीमुळे डिलिट होऊ शकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे सगळे नियम काटेकोरपणे वाचून तुम्ही या फीचरचा वापर करा.