सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

एप्रिल महिन्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार एका टप्प्यात आणि वेळेत दिला जाणार (Government Employee Salary) आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार, राज्य सरकारचा निर्णय
Follow us
| Updated on: Apr 22, 2020 | 7:22 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे आर्थिक घडी विस्कटली (Government Employee Salary) आहे. त्यामुळे मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दोन टप्प्यात देण्यात आला होता. पण एप्रिल महिन्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार एका टप्प्यात आणि वेळेत दिला जाणार आहे. राज्य सरकारने नुकतंच याबाबतचा आदेश काढला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्यात देण्यात (Government Employee Salary) आला होता. मात्र आता एप्रिल 2020 चे वेतन नियमित पद्धतीने एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सर्व विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांना त्यांची वेतन देयके नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वेळीच कोषागरात सादर होतील हे पाहावे, जेणेकरुन कोषागारांनादेखील मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे त्यावर वेळीत कार्यवाही करणे शक्य होईल, असेही यात म्हटलं आहे.

सर्व अनुदानित संस्था, विद्यापीठे, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनादेखील एप्रिलचा पगार वेळेवर देण्यास शासनाची हरकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

मार्च महिन्यात दोन टप्प्यात पगार

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्चच्या वेतनापोटी एप्रिलमध्ये 50 टक्के रक्कम देण्यात येईल. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के  वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना मात्र नेहमीप्रमाणे पूर्ण 100 टक्के वेतन मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

तसेच  मंत्री, आमदार, नगरसेवकांना ४० टक्के वेतन देण्यात येणार असून  ६० टक्के  वेतन नंतर देण्यात येईल, असेही यापूर्वीच्या आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र एप्रिल महिन्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन देण्यात येईल याबाबतचा आदेश काढला (Government Employee Salary) आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.