देशात गरिबी मोजण्याचे मापदंड बदलणार?, ‘या’ निकषांवर गरिबी ठरणार

केंद्र सरकार दारिद्र्य रेषेचे निकष बदण्याचा विचार करत असून लवकरच गरीब असण्याची व्याख्या बदलण्याची शक्यता आहे. (government is thinking to prepare new rules for poverty line)

देशात गरिबी मोजण्याचे मापदंड बदलणार?, 'या' निकषांवर गरिबी ठरणार
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 6:19 PM

दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात देशातील बेरोजगारी वाढलेली असताना केंद्र सरकार दारिद्र्य रेषेची (poverty line) परिभाषा बदलण्याच्या विचारात आहे. यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने (Union Ministry of Rural Development) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार दारिद्र्य रेषेच्या निकषांसोबतच गरिबिची व्याख्या बदलण्याची शक्यता आहे. (government is thinking to prepare new rules for poverty line)

हे असणार गरीब असण्याचे निकष

लोकांचे दारिद्र्य ठरवणारे निकष देशात बलदण्यात येणार आहेत. तशी चर्चा केंद्रीय पातळीवर होत आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने (Union Ministry of Rural Development) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आता नागरिकांचा अधिवास, त्यांचे शिक्षण, परिसरातील स्वच्छता यावरुन कोण गरीब? आणि कोण श्रीमंत? हे ठरणार आहे.

आता 1407 रुपये खर्च न करु शकणारे नागरिक गरीब

रंगराजन समितीने केलेल्या शिफारशीनुसार शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा 1407 रुपये निश्चित करण्याचा विचार केला जातोय. तर ग्रामीण भागासाठी ही सीमा 972 रुपये असणार आहे. म्हणजे शहरात राहणारा नागरिक एक महिन्याला स्वत:वर 1407 रुपये खर्च करु शकत नसेल तर तो गरीब आहे; असे गृहित धरले जाईल. तसेच ग्रामीण भागात स्वत:वर 972 रुपये खर्च न करु शकणारे नागरिक गरीब असतील.

दारिद्र्य रेषा बदलण्याची गरज काय?

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशात, गरिबी तसेच सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतील बदल व्यवस्थित मोजले जात नाहीत. या निकषांमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे. त्यामुळे देशातील दारिद्र्य रेषेचे आकलन याेग्य पद्धतीने झालेले नाही. याच कारणामुळे दारिद्र्य रेषेसाठी निकष बदलने गरजेचे आहे.. तसेच देशात गरिबीची व्याख्या फक्त भूक या निकषावरच न ठरवता अर्थव्यवस्थेचा विकास,  संधी या गोष्टींवरही विचार केला जावा; अशी केंद्रीय ग्रामविकास मंंत्रालायची भूमिका आहे.

संबंधित बातम्या  :

Global Hunger Index | भारतापेक्षा पाकिस्तानात कमी उपासमार; ‘ग्लोबल हंगर इन्डेक्स’ जाहीर

चीन तैवानवर हल्ला करणार? वाचा ड्रॅगनचा संपूर्ण ‘गेम प्‍लॅन’

चीनमध्ये निसर्गाचं अचंबित करणारं रूप, एकाच वेळी 3 सूर्य दिसल्याने जगभरात चर्चा

(government is thinking to prepare new rules for poverty line)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.