फक्त दहा रुपयात केस होतील मऊ, स्वयंपाक घरातील वस्तू ठरेल फायदेशीर
आपल्या स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायदेशीर असतात. यातील अनेक गोष्टी केसांना नैसर्गिक रित्या मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. फक्त दहा रुपयांमध्ये तुम्ही तुमची केस चमकदार आणि मग बनवू शकतात.
हिवाळ्यात केस कोरडे आणि निर्जीव दिसण्याची भीती जास्त त्रासदायक असते. ओलाव्याची कमतरता कायम राहिल्यास केस पुन्हा मऊ होणे कठीण होते. केसांना चमकदार आणि सरळ करण्यासाठी अनेक जण स्ट्रेटनर सह अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतात. सौंदर्य उत्पादने चांगले परिणाम देतात परंतु त्याचे तोटे देखील बरेच आहेत. यामध्ये रसायने असतात जी काही काळानंतर केसांना नुकसान पोहोचवू शकतात. केसांना नैसर्गिक रित्या मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात.
आपल्या स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या निरोगी केस, त्वचा आणि आरोग्य राखण्यासाठी खूप प्रभावी आहेत. यापैकी एक आहे अंडे जे नैसर्गिक रित्या केस सरळ करू शकतात. बाजारात अवघ्या आठ ते दहा रुपयांना मिळणारे अंडे केसांसाठी कसे फायदेशीर आहे ते जाणून घेऊ.
केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय
तुमचे केस चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकतात. घरगुती उपचारांचा फायदा असा आहे की त्यांच्यामुळे हानी होण्याची शक्यता कमी असते केस मऊ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफडीचा गर उपयुक्त आहे. जर तुम्हाला केस नैसर्गिक रित्या कलर करायचे असतील तर ब्लॅकबेरीच्या बियांची पावडर यासाठी उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे मुलायम आणि चमकदार केस मिळवण्यासाठी अंड्याचा हेअर मास्क बनवू शकता.
अंडे आणि खोबरेल तेल
अंड्यामध्ये खोबरेल तेल मिसळून हेअर मास्क तयार करता येतो. यासाठी एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात दोन चमचे खोबरेल तेल घाला. यामध्ये बदामाच्या तेलाचाही समावेश केला जाऊ शकतो. अंघोळीच्या एक तास आधी हा मास्क हाताने किंवा ब्रशने लावा. त्यानंतर शाम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा हा मास्क लावल्यामुळे तुमचे केस चमकदार तर होतीलच पण त्यांना पोषणही मिळेल.
अंडे आणि मध
अंड्यामध्ये मध मिसळून केसांना लावल्याने केस मऊ होतात. एका भांड्यात अंडे घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. तुम्ही त्यात ऑलिव्ह ऑइल आणि दूध देखील मिक्स करू शकता. ब्रशने संपूर्ण केसांवर आणि टाळूला हा मास्क लावा. त्यानंतर एका तासाच्या नंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. केसांना चमकदार बनवण्यासोबतच या हेअर मास्क मुळे त्यांचा कोरडेपणाही दूर होईल.
अंडे आणि दही
अंड्यामध्ये दही मिसळूनही केसांना लावता येऊ शकते. दह्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो ज्यामुळे इन्फेक्शन, कोंडा आणि पिंपल्स दूर होतात. एका भांड्यात अंडी घेऊन त्यात तीन चमचे दही मिक्स करा. हे व्यवस्थित पद्धतीने मिक्स केल्यानंतर केसांना अंडी आणि दह्याचा मास्क लावा आणि शाम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून किमान दोनदा हा घरगुती उपाय केल्याने केस मऊ आणि हायड्रेट होतील.