हॅण्डसम तरुणांचं करिअर धोक्यात: सर्व्हे
मुंबई : जगभरतील हॅण्डसम मुलांसाठी एक दुखद बातमी आहे. तुमची सुंदरता आता तुमच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण करु शकते. हो, आता केवळ ऑफिस पॉलिटिक्स, कामचुकारी, कार्यशैलीच नाही तर तुमचं हॅण्डसम असणंदेखील तुमच्या करिअरसाठी घातक ठरु शकतं. एका सर्व्हेनुसार, हॅण्डसम मुलांना इतरांच्या तुलनेत प्रमोशन कमी मिळतात. याचं कारण म्हणजे त्यांचं हण्डसम असणं. लंडन स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि अमेरिकेच्या […]

मुंबई : जगभरतील हॅण्डसम मुलांसाठी एक दुखद बातमी आहे. तुमची सुंदरता आता तुमच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण करु शकते. हो, आता केवळ ऑफिस पॉलिटिक्स, कामचुकारी, कार्यशैलीच नाही तर तुमचं हॅण्डसम असणंदेखील तुमच्या करिअरसाठी घातक ठरु शकतं. एका सर्व्हेनुसार, हॅण्डसम मुलांना इतरांच्या तुलनेत प्रमोशन कमी मिळतात. याचं कारण म्हणजे त्यांचं हण्डसम असणं.
लंडन स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि अमेरिकेच्या मेरिलँड विश्वविद्यालयने केलेल्या एका सर्व्हेनुसार, कुठल्याही कंपनीच्या बॉससाठी हण्डसम पुरुष हे त्यांच्या पदासाठी धोकादायक मानले जातात. त्यामुळे हण्डसम मुलांना सहसा कंपनीत एखादं महत्वाचं पद मिळण्याची शक्यता कमी असते किंवा त्यांना प्रमोशन मिळत नाही. म्हणजे तुम्ही कामात कितीही चांगले असाल तरीही तुमचं हण्डसम असणं तुम्हाला माहाग पडू शकतं.
मेरिलँड विश्वविद्यालयाचे प्रमुख संशोधक/अभ्यासक प्रोफेसर सन यंग ली यांच्या मते, या सर्व्हेत असे दिसून आले की, जेव्हा एखादा पुरुष दुसऱ्या कुठल्या पुरुषाला नोकरीवर घेत असतो, तेव्हा त्यांचा कल हा हण्डसम पुरुषांविरोधात असतो. म्हणजे हॅण्डसम पुरुषांना नोकरी देण्यास एकप्रकारे नकार असतो. समोरच्या पुरुषाच्या सुंदरतेवर त्याला घ्यायचे की नाही हे ठरवले जाते. यामुळे हॅण्डसम असेल, मात्र जो खरंच योग्य असेल त्याला नोकरी मिळतच नाही. शिवाय प्रमोशनपासूनही लांब रहावं लागतं.
मग आता उद्यापासून ऑफिसला स्टड बनून जायचं की, डोक्याला तेल लावून जायचं हे तुम्हीच ठरवा, कारण प्रश्न प्रमोशनचा आहे..!