‘कोव्हॅक्सिन’ची लस घेऊनही कोरोना संसर्ग, निष्काळजीच्या दाव्यांवर अनिल विज यांचं स्पष्टीकरण

मला 'कोव्हॅक्सिन' लशीची चाचणी घेऊन 14 दिवसच झाले आहेत, अशी माहिती मंत्री अनिल विज यांनी ट्विटरवर दिली.

'कोव्हॅक्सिन'ची लस घेऊनही कोरोना संसर्ग, निष्काळजीच्या दाव्यांवर अनिल विज यांचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 12:26 PM

चंदीगड : हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी ‘कोव्हॅक्सिन’ची लस घेऊनही कोरोना संसर्ग झाल्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली आहे. विज यांनी लसीकरणानंतर काळजी न घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर खुद्द अनिल विज यांनीच ट्विट करुन सर्व आरोपांचे खंडन केले आहे. (Haryana Health Minister Anil Vij clarifies on testing Corona Positive after taking Covaxin vaccine last month)

अनिल विज यांचं स्पष्टीकरण

“कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यापूर्वी मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, की 28 दिवसांनंतर दुसरा डोस घेतल्याच्या 14 दिवसांनंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतील. पूर्ण खबरदारी घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली. माझ्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत आणि मला बरे वाटत आहे” असे ट्विट अनिल विज यांनी केले आहे. मला लस घेऊन 14 दिवसच झाले आहेत, अशी माहितीही विज यांनी ट्विटरवर काही वेळानंतर दिली.

पानिपतहून आल्यानंतर तिथले आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दोन दिवसांनी मला सांगण्यात आले, त्याच दिवशी मी चंदीगडमध्ये चाचणी केली असता, ती निगेटिव्ह आली होती, असंही अनिल विज यांनी स्पष्ट केलं.

भारत बायोटेकचं म्हणणं काय?

अनिल विज यांनी भारत बायोटेक या फार्मास्युटिकल कंपनीच्या कोरोना लसीकरण चाचणीत सहभाग घेतला होता. अनिल विज यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर भारत बायोटेकने अप्रत्यक्षपणे निवेदन दिले आहे. “कोव्हॅक्सिन लशीचे दोन डोस घेणे आवश्यक आहेत. दोन्ही डोस घेतल्याच्या 14 दिवसांनंतर त्याच्या परिणामाचे मूल्यांकन केले जाऊ शकते” असं विज यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता कंपनीने म्हटले आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या 14 दिवसांनंतर ती प्रभावी ठरेल, अशाप्रकारे तिची निर्मिती केल्याचंही भारत बायोटेकने म्हटलं आहे. (Haryana Health Minister Anil Vij clarifies on testing Corona Positive after taking Covaxin vaccine last month)

कोरोना लसीकरण चाचणीत सहभाग

हरियाणाचे आरोग्य मंत्री असलेल्या अनिल विज यांनी गेल्याच महिन्यात कोरोना लसीची चाचणी स्वत:वर करुन घेतली होती. लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून सर्वात आधी मी स्वत:ला लस टोचून घेईन, असं त्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार 20 नोव्हेंबरला त्यांना कोव्हॅक्सिन लस दिली गेली. विज यांना लस दिल्यानंतर त्यांना 28 दिवसांनी पुन्हा दुसरी लस दिली जाणार होती. शिवाय डॉक्टर त्यांच्या शरीरातील अँटिबॉडीजही तपासणार होते. ट्रायलदरम्यान अनिल विज यांच्यासह 200 स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन लस (Covaxin) दिली होती.

लसीबाबत नेमका दावा काय होता?

हरियाणामध्ये कोरोना संकटात भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या चाचणीला सुरुवात केली होती. ही स्वदेशी लस ICMR च्या मदतीने भारत बायोटेकद्वारे बनवण्यात येत आहे. ही लस 60 टक्के यशस्वी ठरेल असा दावा कंपनीने केला होता. दुसरीकडे WHO ने कोणतीही लस 100 टक्के कोरोना व्हायरससाठी प्रभावी असू शकत नाही असंही म्हटलं आहे.

लसीकरण चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात 50 टक्के स्वयंसेवकांना लस देण्यात येईल, तर उर्वरित 50 टक्क्यांना ‘प्लासिबो’ (डमी ड्रग) दिले जाईल. 25 ठिकाणी 26 हजार स्वयंसेवकांवर याची चाचणी केली जात आहे. त्यानंतर या लशीचा प्रभाव समजू शकेल.

संबंधित बातम्या :

कोव्हॅक्सिनची लस टोचूनही कोरोना, हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना संसर्ग

(Haryana Health Minister Anil Vij clarifies on testing Corona Positive after taking Covaxin vaccine last month)

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.