अलिकडे फडणवीसांचे मुहूर्त चुकतात, मुश्रीफांचा टोला, भाजपचं आंदोलन म्हणजे पुतना-मावशीचं प्रेम, शेट्टींची टीका

हसन मुश्रीफ यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली (Hasan Mushrif on Milk Agitation).

अलिकडे फडणवीसांचे मुहूर्त चुकतात, मुश्रीफांचा टोला, भाजपचं आंदोलन म्हणजे पुतना-मावशीचं प्रेम, शेट्टींची टीका
Follow us
| Updated on: Aug 01, 2020 | 12:50 PM

कोल्हापूर : राज्यभरात दूध उत्पादक संघर्ष समिती आणि भाजपसह विरोधी पक्षांचं दूध दरवाढीसाठी आक्रमक आंदोलन सुरु आहे. यावरुन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली (Hasan Mushrif on Milk Agitation). अलिकडे फडणवीसांचे सगळेच मुहूर्त चुकत आहेत. दूध आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्तही चुकीचा आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न मुश्रीफ यांनी उपस्थित केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी देखील भाजपच्या दूध आंदोलनावर टीका केली आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, “दुध आंदोलनासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. बकरी ईद, शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाकडे कोण लक्ष देणार? अलीकडे फडणवीस यांचे सगळेच मुहूर्त चुकत आहेत.”

“भाजपचं राज्य सरकारविरोधातील आंदोलन म्हणजे पुतणा-मावशीचं प्रेम”

राजू शेट्टी म्हणाले, “दूध उत्पादकांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने त्यांच्या थेट खात्यावर प्रतिलिटर किमान 5 रुपये जमा करणं हाच उपाय आहे. आगामी दोन ते तीन दिवसात राज्य सरकारने हा निर्णय न घेतल्यास सरकारला उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल.”

“आज भाजप आणि विरोधीपक्ष केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन करत असतील तर हे पुतणा-मावशीचं प्रेम आहे. कारण ठोस उपाययोजना ही केंद्र सरकारनेच केली पाहिजे. आयात थांबवली पाहिजे. निर्यातील अनुदान द्यायला हवं. तसेच जीएसटी मागे घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने अभूतपूर्व संकटात सापडलेला दूध उत्पादक यातून बाहेर पडेल,” असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.

“महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहकारी दूध संस्थांकडूनच दूध उत्पादकांची लूट”

दूध आंदोलन राजकीय हेतूनं टार्गेट करण्यासाठी होत असेल तर ही दूध उत्पादकांची फसवणूक आहे, असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांनी देखील दूध आंदोलनात सहभागी होत राज्य सरकारवर सडकून टीका केली. राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत नगर-मनमाड रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन करण्यात आलं. विखे पाटलांसह भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. उत्साही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको दरम्यान दूध टँकरही अडवला.

यावेळी राधाकृष्ण विखे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहकारी दूध संस्थांकडूनच दूध उत्पादकांची लूट होत आहे, असा घणाघाती आरोप केला.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका, राम शिंदे यांचं टीकास्त्र

Milk Agitation LIVE: आघाडीच्या नेत्यांच्या सहकारी संस्थाकडूनच दूध उत्पादकांची लूट : राधाकृष्ण विखे पाटील

Milk Agitation Milk Price

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.