न्याय होईपर्यंत लढतच राहू; हाथरसमधून प्रियांका गांधींनी योगी सरकारला ललकारले

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज पुन्हा एकदा हाथरसकडे निघाले आहेत.त्यामुळे नोएडा ते हाथरसमार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून अनेक ठिकाणी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली.

न्याय होईपर्यंत लढतच राहू; हाथरसमधून प्रियांका गांधींनी योगी सरकारला ललकारले
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 8:37 PM

नवी दिल्ली: हाथरस येथे झालेल्या बलात्कार आणि हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज पुन्हा एकदा हाथरसकडे निघाले. तब्बल पाच तास प्रवास केल्यानंतर संध्याकाळी साडे सातच्या सुमारास राहुल आणि प्रियांका गांधी पीडितेच्या घरी पोहोचले. यावेळी प्रियांका यांना पाहताच पीडितेच्या कुटुंबीयांच्या अश्रूचा बांध फुटला. त्यांचा अक्रोश पाहून प्रियांका यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी पीडितेच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Hathras Case : Rahul Gandhi To Meet Victim Family)

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी संध्याकाळी उशिरा या पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचले. घरात जाताच प्रियांका यांनी पीडित तरुणीच्या आईची गळाभेट घेऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केलं. त्यामुळे पीडितेची आई गहिवरून गेली आणि तिच्या अश्रूचा बांध फुटला. पीडित तरुणीची आई हमसून हमसून रडू लागल्याने प्रियांका यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी न्यायासाठी आम्ही संघर्ष करू. काँग्रेस आणि गांधी कुटुंब तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एकटे नाहीत, असं सांगत राहुल यांनी या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. तब्बल 25 मिनिटे राहुल आणि प्रियांका गांधी पीडितेच्या घरी होते. यावेळी त्यांनी त्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं.

सुरक्षा देण्यात योगी सरकार फेल: राहुल

पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल यांनी माध्यमांशी संवाद साधला. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू, असं राहुल यांनी सांगितलं. तसेच पीडित कुटुंबाची सुरक्षा करण्यात योगी सरकार फेल गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

जिल्हाधिकाऱ्याचं केवळ निलंबन करण्यात येऊ नये तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अन्यायाविरुद्ध लढणार: प्रियांका

अन्यायाविरुद्ध आम्ही लढतच राहणार आहोत. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देईपर्यंत आमचा संघर्ष राहील. आमचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही, असं यावेळी प्रियांका गांधी यांनी सांगितलं. आम्ही अन्यायाच्या विरोधात उभं राहू. जोपर्यंत न्याय होत नाही. तोपर्यंत आम्हाला कोणी रोखू शकत नाही. आम्ही लढतच राहू, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, तोंडाला मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासह काही अटींवर पोलिसांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांना हाथरसला जाण्याची पोलिसांनी परवानगी दिली होती. त्यामुळे राहुल गांधी हे दुपारीच नोएडावरून हाथरसकडे जायला निघाले होते. नोएडा ते हाथरस हा दोन ते अडीच तासाचा रस्ता आहे. मात्र, राहुल यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांचा जत्था असल्याने या कार्यकर्त्यांना आवरणे पोलिसांना कठिण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केली होते. राहुल यांचा ताफा यमुना एक्सप्रेसवेवर आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. राहुल गांधी यांना पाहताच एक्सप्रेसवर थांबलेल्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार करावा लागला.

डीएनडी बॉर्डवर राहुल यांचा ताफा येताच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी कोविड नियमांचं उल्लंघन केलं. अनेक कार्यकर्त्यांनी मास्कही घातलेलं नव्हतं. तर दुसरीकडे काँग्रेसचे उत्तर प्रदेश अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांना लखनऊच्या बहुखंडी येथील घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. लल्लू यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने लखनऊमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

प्रियांकाचं सारथ्यं

राहुल आणि प्रियांका गांधी घरातून निघाले तेव्हा प्रियांका गांधी या ड्रायव्हिंग सीटवर बसल्या. त्यांनी स्वत: गाडी चालवण्यास सुरुवात केली. राहुल गांधी त्यांच्या बाजूलाच बसलेले होती. यावेळी राहुल गांधी अधूनमधून उत्तर प्रदेशातील पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत होते, असं सूत्रांनी सांगितलं.

35खासदारांचं शिष्टमंडळ

राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे 35 खासदार होते. खासदारांचं हे शिष्टमंडळ हाथरस येथे जाऊन पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटून निवेदन देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाचजणांना हाथरसला जाण्याची परवानगी

राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी, मुकूल वासनिक, अधीर रंजन चौधरी आणि केसी वेणुगोपाल राव यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच या नेत्यांना कोविड प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Hathras Case : Rahul Gandhi To Meet Victim Family)

पुन्हा हाथरसला येऊ

दिल्लीतून हाथरसकडे निघण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी जर आम्हाला हाथरसमध्ये जाऊ दिलं नाही तर आम्ही पुन्हा हाथरसमध्ये जाण्याचा प्रयत्न करू, असं प्रियांका यांनी म्हटलं होतं.

  • राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह ५ काँग्रेस नेत्यांनाच हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबीयांना भेटता आले
  • दिल्लीच्या निवासस्थानातून निघून राहुल गांधी नोएडा मार्गे हाथरसला निघाले होते
  • डीएनडी फ्लायओव्हर जवळ राहुल यांचा ताफा येताच काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला होता
  • हाथरसमध्ये कलम 144 लागू

संबंधित बातम्या:

LIVE | नोएडा ते हाथरस, राहुल गांधींचा मार्च

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, त्यांचा तोल गेला असावा : रावसाहेब दानवे

(Hathras Case : Rahul Gandhi To Meet Victim Family)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.