कोल्हापुरात HDFC बँकेतील दोन खाती हॅक, 67 लाख लंपास
कोल्हापूर: कोल्हापुरात एचडीएफसी बँकेचा सर्वर हॅक करून दरोडा घालण्यात आला आहे. यामध्ये 67 लाख 88 हजार लंपास झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरीमधील एचडीएफसी बँकेत ऑनलाईन दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये हॅकर्सने 67 लाख 88 हजार लंपास केले. ही सगळी रक्कम आहे दि. कोल्हापूर अर्बन बँक यांची. कोल्हापूर अर्बन बँकेची […]

कोल्हापूर: कोल्हापुरात एचडीएफसी बँकेचा सर्वर हॅक करून दरोडा घालण्यात आला आहे. यामध्ये 67 लाख 88 हजार लंपास झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरीमधील एचडीएफसी बँकेत ऑनलाईन दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये हॅकर्सने 67 लाख 88 हजार लंपास केले. ही सगळी रक्कम आहे दि. कोल्हापूर अर्बन बँक यांची. कोल्हापूर अर्बन बँकेची दोन खाती एचडीएफसी बँकेमध्ये होती आणि त्यांच्याच खात्यातील ही रक्कम लंपास केली.
या प्रकारानंतर टीव्ही 9 मराठीने अर्बन बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी ग्राहकांना चिंता करण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे.
ही रक्कम लंपास करण्यासाठी हॅकर्सनी एचडीएफसी बँकेचा सर्व्हर हॅक केला. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन दरोडा पडण्याची कोल्हापुरातील कदाचित ही पहिलीच घटना असेल. त्यामुळे पोलीस आता सायबर गुन्हे अन्वेषण विभागाची मदत घेऊन चोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
हायटेक जमान्यात सर्वच ऑनलाईन व्यवहार धोक्याचे बनले आहेत. कधी? कोण? आपल्या खात्यातून रक्कम लंपास करेल याचा नेम नाही. त्यामुळे आता अत्याआधुनिक यंत्रणेबरोबरच नागरिकांनीदेखील सतर्क राहण्याची गरज आहे.