मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार? की निर्णय ‘जैसै थे’? 9 डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी

सर्वोच्च न्याायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती हटविण्यासाठी केलेल्या अर्जावर 9 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार? की निर्णय 'जैसै थे'?  9 डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 8:39 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला (Maratha reservation)दिलेली स्थगिती उठविण्यासाठी केलेल्या अर्जावर 9 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर दुपारी दोन वाजता होईल. तशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक (Ashok Chavan) चव्हाण यांनी दिली. (hearing on removal of the stay on Maratha reservation will be on 9th December)

9 डिसेंबरला सुनावणी

एसईबीसी प्रवर्गांतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे. ही स्थगिती उठविण्याची मागणी राज्य शासनाने केलेली आहे. त्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने घटनापीठ स्थापन करुन आरक्षणविषयक सुनावणी घटनापीठासमोर करावी, अशी मागणी अर्जाद्वारे केली होती. ती मागणी मान्य झाली आहे. आता पाच सदस्यीय घटनापीठासमोर येत्या 9 डिसेंबरला मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. ही महत्त्वाची माहिती अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली.

दरम्यान, मराठा आरक्षणाला मिळालेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी घटनापीठ स्थापन करुन राज्य सरकारच्या अर्जावर सुनावणी केली जावी, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. राज्य सरकारची ही मागणी मान्य होण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच चव्हाण यांनी केले होते. त्यांनतर आता येत्या 9 डिसेंबरला राज्य सरकारच्या आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.

संबंंधित बातमी :

BREAKING : मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार; मुख्यमंत्री आणि संभाजीराजेंची चर्चा सकारात्मक

मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, समाजाचं नुकसान होऊ नये हीच प्रमाणिक भावना : अशोक चव्हाण

फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्या, तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

(hearing on removal of the stay on Maratha reservation will be on 9th December)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.