Hero MotoCorp: हिरो मोटोकॉर्पने लाँच केली डेस्टीनी 125 एक्सटेक… स्पेसिफिकेशन्ससह किंमत जाणून घ्या
नवीन एलईडी हेडलॅम्प, रेट्रो डिझाइन आणि आलिशान क्रोम एलिमेंट देण्यात आले असल्याने या स्कूटरला अधिक प्रीमियम लूक देण्यात आलेला आहे. ही स्कूटर विविध फीचर्स, मायलेज व आकर्षक डिझाइनमुळे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
स्कूटरच्या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी उत्पादक कंपनी हिरा मोटोकॉर्पने डेस्टीनी 125 एक्सटेक (Hero MotoCorp) हे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. हे नवीन व्हर्जन पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम असणार आहे. नवीन आलिशान डेस्टीनी 125 एक्सटेकला अनेक नवीन डिझाईन आणि थीम देण्यात आले असल्याने यामुळे ही स्कूटर अधिक आकर्षक झाली आहे. यात, नवीन एलईडी हेडलॅम्प, रेट्रो डिझाइन आणि आलिशान क्रोम एलिमेंट (element) देण्यात आले असल्याने या स्कूटरला अधिक प्रीमियम लूक देण्यात आलेला आहे. ही स्कूटर विविध फीचर्स, मायलेज व आकर्षक डिझाइनमुळे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या लेखातून स्कूटरच्या इतर वैशिष्ट्ये (Features) व स्पेसिफिकेशनबाबत माहिती घेणार आहोत.
ही आहेत वैशिष्ट्ये
हिरा मोटोकॉर्पने डेस्टीनी 125 मध्ये i3S तंत्रज्ञान, फ्रंट युएसबी चार्जर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि एसएमएस अलर्टसह नवीन डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर, अधिक आराम आणि ड्रायव्हिंगसाठी साइड स्टँड इंजिन कट ऑफ आणि सीट बॅकरेस्ट यासारखी नवीन तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत. या स्कूटरला पूर्वीपेक्षा चांगले मायलेज, अधिक पिकअप आणि किमान मेंटेनन्स आहे. नवीन हिरा मोटोकॉर्पने डेस्टीनी 125 ची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत 74950 रुपये आहे आणि डेस्टीनी 125 एक्सटेकची किंमत 80690 रुपये ठेवण्यात आली आहे.
काय आहे खास
– एलइडी हेडलॅम्प्स : नवीन हेडलॅम्प्स लांब अंतरापर्यंत आणि संपूर्ण रस्त्यावर पोहोचताना चांगला प्रकाश देतात आणि सर्व ड्रायव्हिंग परिस्थितीत रस्त्यावर जास्तीत जास्त ऑन रोड व्हिजिबीलीटी देतात. प्रभावी हेडलॅंपमुळे रात्रीच्या वेळीदेखील स्कूटर चालविताना अतिशय कंफर्ट वाटते. या शिवाय अन्यदेखील फीचर्स स्कूटरमध्ये इनबिल्ट देण्यात आलेले आहेत.
– प्रभावी मॉडर्न रेट्रो स्टाइल : नवीन डेस्टीनी 125 एक्सटेकमध्ये अनेक प्रीमियम क्रोम घटक आहेत जे स्कूटरचे शक्तिशाली रेट्रो कॅरेक्टर अंडरलाइन करतात. मिरर, मफलर प्रोटेक्टर आणि हँडलबारमध्ये क्रोम जोडण्यामुळे त्यातील टिकाऊपणा वाढतो. या शिवाय मागील सिटरसाठी ब्रँडेड सीट बॅकरेस्ट चांगल्या स्वरुपाचे आहे.
– कनेक्टिव्हिटी : ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह नवीन डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर इनकमिंग आणि मिस्ड कॉल अलर्ट, आरटीएमआयसह वेळ देखील दर्शवतो. याशिवाय नवीन फ्यअल इंडीकेटर देखील देण्यात आला आहे. ही स्कूटर सात आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये खास नेक्सस ब्लूचा समावेश आहे.
– इंजिन : डेस्टीनी 125 एक्सटेक 125 सीसी बीएस-व्हीआय इंजिनसह उपलब्ध आहे. ही स्कूटर राइडर आणि मागचा प्रवासी दोघांसाठी अत्यंत सुरक्षित अशी डिझाइन केलेली आहे. स्कूटरमध्ये साइड-स्टँड व्हिज्युअल इंडिकेशन आणि ‘साइड-स्टँड इंजिन कट ऑफ’ उपलब्ध आहेत.