‘फेअर अँड लव्हली’चा ‘फेअर’ जाणार, हिंदुस्थान युनिलिव्हरकडून नाव बदलण्याची घोषणा

भारतातील प्रसिद्ध फेअरनेस क्रीम 'फेअर अँड लव्हली'च्या नावातून आता 'फेअर' हा शब्द काढण्यात येणार आहे (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).

'फेअर अँड लव्हली'चा 'फेअर' जाणार, हिंदुस्थान युनिलिव्हरकडून नाव बदलण्याची घोषणा
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 5:00 PM

मुंबई : भारतातील प्रसिद्ध फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’च्या नावातून आता ‘फेअर’ हा शब्द काढण्यात येणार आहे (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream). फेअर अँड लव्हली क्रीमचं उत्पादन करणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ‘फेअर’ या शब्दावरुन कंपनीवर वर्णभेदाच्या मुद्यावरुन प्रचंड टीका होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे (Hindustan Unilever remove Fair word from fairness cream).

“‘फेअर अँड लव्हली’ क्रीमच्या नावातून ‘फेअर’ हा शब्द हटवला जाईल आणि नव्या नावासोबत प्रोडक्ट लाँन्च केलं जाईल”, अशी घोषणा हिंदुस्थान युनिलिव्हरने केली आहे. नव्या नावाबाबत मंजुरी मागितली असून त्यासाठी जवळपास एक ते दोन महिने लागतील, अशी माहितीदेखील कंपनीकडून देण्यात आली आहे.

याशिवाय कंपनी आता आपल्या सौंदर्यप्रसाधनाच्या उत्पादनांच्या नावामध्ये ‘फेअरनेस’, ‘व्हाइटनिंग’ आणि ‘लाईटनिंग’ या सारख्या शब्दांचा उल्लेख करणार नाही, असंदेखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हिदुस्थान युनिलिव्हर कंपनीने 1975 साली ‘फेअर अँड लव्हली क्रीम’ लाँन्च केली होती. देशभरात जवळपास 50 टक्के नागरिक ही क्रीम वापरतात. या क्रीमचा वापर केल्यानंतर चेहरा उजळतो, गोरा होता, असा दावा कंपनीच्या अनेक जाहिरातींमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या कंपनीवर वर्णभेदाचा आरोप करत प्रचंड टीकादेखील झाली आहे.

‘फेअर अँड लव्हली क्रीम’मधून कंपनीने गेल्यावर्षी जवळपास 3.5 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. मात्र, वर्णभेदावरुन लोकांच्या मनात असलेल्या प्रचंड असंतोषाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीसह इतर काही कंपन्यादेखील आपल्या सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांची नाव बदलण्याच्या तयारीत आहेत.

सध्या जगभरात वर्णभेदावरुन असंतोष आहे. अमेरिकेत जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूनंतर वर्णभेदाविरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. या आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत आहेत. त्यातूनच हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, अमेरिकेत वर्णभेदावरुन सुरु असलेल्या या आंदोलनात काही दिवसांपूर्वी भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या कुटुंबासह सहभागी झाली होती. तिने या आंदोलनात सहभागी झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावेळी भारतातील फेअर अँण्ड लव्हली क्रीमच्या नावावरुन प्रियंकाला अनेकांनी प्रश्न विचारले होते.

हेही वाचा : Salon and Gym | अखेर सलून आणि जिम सुरु करण्यास राज्य सरकारची परवानगी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.