Covid-19 हेल्पलाइन ते ताप तपासणी केंद्र, कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलिसांसाठी गृहमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी गृह विभागामार्फत घेण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे (Home Minister Anil Deshmukh).

Covid-19 हेल्पलाइन ते ताप तपासणी केंद्र, कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलिसांसाठी गृहमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा
Follow us
| Updated on: May 13, 2020 | 11:06 PM

मुंबई : कोरोनाविरोधाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका निभवणाऱ्या पोलीस दलातील योद्ध्यांसाठी गृह विभागामार्फत (Home Minister Anil Deshmukh) विविध सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी गृह विभागामार्फत घेण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे (Home Minister Anil Deshmukh).

राज्यातील पोलिस दल कोरोनाविरोधाच्या लढाईत 24 तास कार्यरत आहेत. कार्यक्षमतेच्या दुप्पट पोलिसांना काम करावं लागत आहे. त्यामुळे साहाजिकच त्यांच्या आरोग्यावर तसेच कुटुंबियाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. राज्यातील जवळपास 900 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या सर्वांच्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाने पोलिसांसाठी विविध सुविधा दिल्या आहेत.

1. Covid-19 हेल्पलाइन

राज्यातील पोलिसांना विविध कोविड रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार मिळावेत यासाठी एक कोविड हेल्पलाइन संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आलेली आहे. या हेल्पलाईनद्वारे तज्ज्ञांकडून समुपदेशन आणि मार्गदर्शन केले जाते. अशाच प्रकारचं कक्ष मुंबई पोलीस आयुक्तालयमार्फत मुंबई पोलिसांसाठीदेखील तयार करण्यात आलं आहे. दहा अपर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात दहा कोविड कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याद्वारे पोलिसांसाठी राखीव असलेल्या रुग्णालयातील रिक्त बेडची संख्या, तसेच इतर अनुषंगिक माहितीही दिली जाते.

2. सुरक्षेसाठी 4 कोटींची साधनसामग्री

राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आतापर्यंत जवळपास 7.5 लाख विविध प्रकारचे मास्क 15 हजार लिटर सँनिटायझर, 22 हजार फेस शिल्ड, 44 हॅन्ड ग्लोव्हज, ड्रोन कॅमेरा अशा आवश्यक असलेल्या जवळपास चार कोटी रुपयांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलिसांसाठी देखील जवळपास 2.5 कोटी रुपयांच्या अशाच आवश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत. विविध वित्तीय संस्था, कंपन्या सामाजिक संस्था, यांच्याकडूनही देणगी स्वरुपात अशा वस्तू मिळाल्या आहेत. याखेरीज बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी अल्पोपहार आणि मिनरल वॉटरची व्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे.

3. खरेदीचे अधिकार, 137 कोटींचा निधी

पोलिसांच्या आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या वस्तूंची कमतरता पडू नये, याकरिता कोविड 19 प्रतिबंधात्मक आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीकरीता पोलीस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आले आहेत. असे अधिकार मुंबई पोलीस आयुक्तालयातही देण्यात आले. यासाठी जवळपास 137 कोटी रुपयांचा निधी, पोलीस कल्याण निधीतून मंजूर करण्यात आला. तसेच प्रत्येक अप्पर आयुक्तालय क्षेत्रासाठी 10 कोटी निधीदेखील मंजूर करण्यात आलेला आहे. आवश्यकता भासल्यास यातून सर्व खरेदी करण्यात येईल.

4. प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप

पोलिसांची प्रतिबंधात्मक शक्ती वाढावी तसेच शारीरिक क्षमता टिकून राहावी यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप देखील करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने होमिओपॅथी औषधी, तसेच vitamin C,D,Mulivitamin या गोळ्यांचे वाटप घटक स्तरावर करण्यात येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातही अशाच प्रकारच्या 10 कोटी रुपयांच्या प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात येत आहे.

5. कोविड अग्रिम

कोरोनाबाधित पोलिसांना पोलीस कल्याण निधीतून एक लाख रुपयाचा अग्रिम देण्यात येत आहे. आतापर्यंत तीन कोटी रुपयांचा अग्रिम मंजूर करण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातही अशाच प्रकारचे अग्रिम वाटप करण्यात आले आहे.

6. शासकीय अनुदान

कोरोना संदर्भात साधनसामुग्री घेण्याकरिता राज्यात पोलीस विभागाला 9 कोटी रुपयांचे अनुदान कार्यालयीन खर्चापोटी देण्यात आले. तर मुंबई पोलीस आयुक्तालयातही आतापर्यंत 1 कोटी 45 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.

7. सर्वोत्तम उपचार मिळावेत याकडे लक्ष

महाराष्ट्र पोलीस कुटुंब योजनेअंतर्गत covid-19 उपचार राज्यातील नामांकित रुग्णालयात करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याबाबत घटक प्रमुखांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत याकडेही लक्ष आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाशीदेखील संवाद साधला जात आहे. covid-19 कक्षाच्या माध्यमातून राज्यात आणि मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलिसांची काळजी घेतली जाते.

8. कर्तव्यात सूट

50 वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना जनतेशी संपर्क येईल, अशी कोणतीही कामे दिली जात नाहीत. तसेच 55 वर्षावरील पोलिसांना रजा घेण्याची परवानगीदेखील देण्यात आलेली आहे.

9. वारसांना नुकसान भरपाई

कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण होऊन दुर्दैवाने पोलीस कर्मचारी मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंबाप्रती विभागास सहानुभूती आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत आतापर्यंत 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलीस फाउंडेशन मार्फत 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. राज्यातही हुतात्मा निधी मार्फत 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान कुटुंबीयांना देण्यात येते.

10. प्रशंसापात्र रक्कम

मुंबई पोलीस आयुक्तालयमार्फत पोलिसांना कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण झाली, तर त्यास 10 हजार रुपये प्रशंसापात्र रक्कम देण्यात येत आहे. आयुक्तालयामार्फत आतापर्यंत 25 लाख 80 हजार रुपये थेट पोलिसांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

11. ताप तपासणी केंद्र (Fever checking centre)

कोरोना संदर्भात काही लक्षणे दिसल्यास अथवा शंका आल्यास मुंबईत महानगरपालिकेच्या सहकाऱ्याने दोन ठिकाणी ताप तपासणी केंद्र देखील सुरु करण्यात आली आहेत. या ठिकाणी पोलीस आणि त्यांचे कुटुंब येऊन तपासणी करु शकतात. आतापर्यंत 1108 व्यक्तींची तपासणी या केंद्रात झाली आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Patient | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजारच्या उंबरठ्यावर, मुंबई, पुण्यासह कुठे किती रुग्णांची वाढ?

Malegaon Corona | राजेश टोपेंसोबत बैठक सुरु असतानाच रिपोर्ट आला, मालेगावचे मनपा आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.