मुंबई : कोरोनाचा धोका वाढत असला तरी राज्य आता अनलॉकच्या प्रक्रियेत आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. 5 ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारही पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. पण जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नियमांचं पालन गेलं नाही तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, नियमांचं पालन होतं की नाही हे पाहण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. (Hotel restaurant and bar owners license will be revoked permanently if not follow corona rules)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसारच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. या नियमांचं हॉटेल चालकांकडून पालन होतं आहे की नाही, हे पाहण्यासाठी पथकं स्थापन केली जाणार आहेत. ही पथकं हॉटेलची तपासणी करणार असून यामध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 50 हजार रुपयांचा दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
तसंच, दुसऱ्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास हॉटेल परवाना काही दिवसांसाठी निलंबित आणि जर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास हॉटेल व्यवसायाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू आहे का, प्रवेश करण्याच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था, थर्मलद्वारे शरीराचे तापमान तपासणे, हवा खेळती, आवश्यक ते सामाजिक अंतर, डिजिटल पेमेंटला प्राधान्य, चांगल्या प्रतीचे पेपर नॅपकीन, वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आदी मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचनांचे पालन होतं की नाही, यावर लक्ष ठेवण्याबरोबच नियमांच्या अंमलबजावणीचे काम विशेष पथक करणार आहे. शहरामधील पथकामध्ये मनपाचे कर्मचारी, उत्पादन शुल्कचे अधिकारी आणि पोलीस यांचा समावेश असणार आहे. तर, ग्रामीण भागात महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. (Hotel restaurant and bar owners license will be revoked permanently if not follow corona rules)
मुंबई पालिकेचे हॉटेल्ससंदर्भातील काही नियम
– मुंबईत हॉटेल्समध्ये टेबलाचे प्री-बुकिंग आवश्यक
– ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एकावेळेस हॉटेलमध्ये येण्यास परवानगी नाही
– दोन टेबलमध्ये कमीत कमी 2 ते 3 फुटांचे अंतर आवश्यक
– टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता करणं गरजेचं
– हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविड टेस्ट करणं बंधनकारक
इतर बातम्या –
IPL 2020, CSK vs KKR : गोलीकीपर प्रमाणं झेपावत धोनीनं घेतला कॅच, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
VIDEO : Fast News | मंदिर सुरु करण्यासंदर्भातील महत्वाच्या घडामोडीhttps://t.co/4gytAddx9u
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2020
(Hotel restaurant and bar owners license will be revoked permanently if not follow corona rules)