पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद राहणार आहेत (Hotels and bars closed in Pune). पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.

पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद
Follow us
| Updated on: Mar 17, 2020 | 4:56 PM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद राहणार आहेत (Hotels and bars closed in Pune). पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच 17 मार्च ते 19 मार्चपर्यंत सर्व हॉटेल्स आणि बार बंद ठेवावे, असं आवाहन पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी केलं आहे. मात्र. बंदीची सक्ती नाही, असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे (Hotels and bars closed in Pune).

पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 16 रुग्ण आढळले आहेत. दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे आणि ते धोकादायक आहे. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी न जाणंच योग्य ठरेल. याच पार्श्वभूमीवर काल (16 मार्च) पुण्याच्या व्यापारी असोसिएशनने किराणा, दुध आणि इतर जीवनाश्मक वस्तूंचे दुकाण वगळता सर्व दुकाण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आज पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने अगदी तसाच निर्णय घेतला आहे.

याशिवाय पुणे पोलिसांनी आज सकाळी पुण्यातील काही हॉटेल्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही हॉटेल्स किती तारखेपर्यंत बंद राहतील याबाबत माहिती मिळालेली नाही. त्यानंतर दुपारी पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने पुणे शहरातील सर्व हॉटेल्स आणि बार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

पुण्यात व्यापार बंद

कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापार आजपासून तीन दिवस बंद (Pune trade market and shops close) राहणार आहे. पुण्यातील व्यापारी महासंघाने हा निर्णय घेतला आहे. किराणा, दूध, भाजीपाला वगळून, घाऊक आणि रिटेल व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात येतील. महासंघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी ही  माहिती, दिली. (Pune trade market and shops close)

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 9
  • पुणे – 7
  • मुंबई – 6
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • एकूण 39

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • एकूण – 39 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

संबंधित बातम्या : Corona Updates LIVE: सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद राहणार – सूत्र

'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.