AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर किती वेळ जिवंत राहतो? संशोधनात अंचबित करणारी माहिती समोर

संशोधकांनी इन्फ्लुएंजा व्हायरस आणि नोव्हल कोरोना व्हायरसचा तुलनात्मक अभ्यास केला असून त्यामधील माहिती जगासमोर मांडली आहे.

कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर किती वेळ जिवंत राहतो? संशोधनात अंचबित करणारी माहिती समोर
Covid Test
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 9:55 AM

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर तब्बल नऊ तास जिंवत राहू शकतो, अशी माहिती एका अभ्यासात समोर आली आहे. संशोधकांनी इन्फ्लुएंजा व्हायरस आणि नोव्हल कोरोना व्हायरसचा तुलनात्मक अभ्यास केला असून त्यामधील माहिती जगासमोर मांडली आहे. अभ्यासात म्हटले आहे की मानवी त्वचेवर इन्फ्लुएंजा व्हायरस (आयव्ही) दोन तास जिंवत राहू शकतो. तर कोरोना व्हायरस (Covid-19) मानवी त्वचेवर तब्बल नऊ तास जिंत राहू शकतो. (How many hours coronavirus can stay on human skin – study reveals)

कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर किती वेळ जिवंत राहतो? याबाबतचं संशोधन क्लिनिकल इन्फेक्शस डिसीजने प्रकाशित केलं आहे. अभ्यासात म्हटले आहे की, दोन्ही व्हायरस हॅण्ड सॅनिटायझरने निष्क्रिय होतात. सतत हॅण्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला हवेत, ही बाब क्लिनिकल इन्फेक्शस डिसीजने प्रकाशित केलेल्या अभ्यासावरुन पुन्हा एकदा अधोरेखित होते. सदर संशोधनात प्रामुख्याने जपानच्या क्योटो येथील प्रिफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनमधील संशोधक सहभागी झाले होते. हात स्वच्छ राखणे हा कोरोनाला रोखण्यासाठीचा मुख्य उपाय असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 69 लाखांवर

जगभरात सध्या 3 कोटी 71 लाख 10 हजार 987 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 69 लाख 77 हजार 08 रुग्ण एकट्या भारतात आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 964 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 59 लाख 85 हजार 505 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

भारताप्रमाणे अमेरिका आणि ब्राझीलमध्येदेखील कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. अमेरिका आतापर्यंत 78 लाख 94 हजार 478 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 लाख 18 हजार 648 बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्येही कोरोनाबाधितांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे तर 1 लाख 49 हजार 692 बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

कोरोना वाढला तर प्रत्येक सेकंदाला गर्भातच होईल बाळाचा मृत्यू, WHO चा गंभीर इशारा

Rajesh Tope | कोरोना टेस्ट 800 रुपयांत होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

TOP 9 News | कोरोना संदर्भातील टॉप 9 न्यूज | 9 PM | 9 October 2020

(How many hours coronavirus can stay on human skin – study reveals)

पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.