मी केवळ व्हिसा मिळवण्यासाठी बेनेडिक्टशी लग्न केलं : राधिका आपटे

अभिनेत्री राधिका आपटे हिने 2012 मध्ये ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले होते, कारण व्हिसा मिळवणे सोपे होते, स्वतः राधिकाने याबाबत खुलासा केला आहे.

मी केवळ व्हिसा मिळवण्यासाठी बेनेडिक्टशी लग्न केलं : राधिका आपटे
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 10:22 AM

मुंबई : अभिनेत्री राधिका आपटे हिने 2012 मध्ये ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले होते, कारण व्हिसा मिळवणे सोपे होते, स्वतः राधिकाने याबाबत खुलासा केला आहे. तसेच राधिकाने सांगितले की, लग्नासारख्या गोष्टींवर तिचा विश्वास नाही. (I married Benedict Taylor just to get a visa says Radhika Apte)

सध्या बेनेडिक्टसोबत लंडनमध्ये असलेल्या राधिकाने अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत बोलताना अनेक गोष्टी शेअर केल्या. हा व्हिडीओ विक्रांतने त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला आहे.

राधिका आणि विक्रांत दोघे एकमेकांशी बोलत होते. सहसा मुलाखतीत विचारले जात नाहीत, असे प्रश्न दोघांनी एमकेकांना विचारले. विक्रांतने राधिकाला लग्नाबाबत प्रश्न विचारल्यावर राधिका म्हणाली की, लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, हे समजल्यामुळे मी लग्न केलं.

माझा लग्नावर विश्वास नाही : राधिका

राधिका म्हणाली की, लग्नाबाबत कोणत्याही सीमा असू नये. I am not marriage person आणि माझा यावर फार विश्वासही नाही. आम्हाला (मला आणि बेनेडिक्टला) एकत्र राहायचे होते, परंतु व्हिसामुळे अनेक अडचणी येत होत्या. लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवण सोप्पं होतं. त्यामुळे आम्ही लग्न केलं.

View this post on Instagram

Say hello to Netflix’s new Massey-iah. #VikFlix @netflix_in @radhikaofficial

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey87) on

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतचा राधिकाचा ‘राते अकेली है’ हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील राधिकाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

राधिका सध्या बेनेडिक्टसोबत लंडनमध्ये आहे. तिने तिचा लॉकडाऊन लंडनमध्येच घालवला. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने तिच्या लॉकडाऊनमधील रुटीनबाबत चर्चा केली होती.

राधिका म्हणाली की, मी केवळ एकच रुटीन फॉलो केलं नाही. या काळात मी खाण्यावर जोर दिला. खूप व्यायाम केला. थोडाफार लिहिण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न केला. या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, तसेच काही वाईट गोष्टीदेखील घडल्या आहेत.

संबंधित बातम्या

संजय दत्तला विश्रांतीचा सल्ला, ‘केजीएफ 2’चे अ‍ॅक्शन सीन्स बदलण्याची शक्यता

Mirzapur 2 | ‘नेताजी बनना है तो गुंडे पालो, गुंडे मत बनो’, सोशल मीडियावर ‘मिर्झापूर 2’ची हवा!

‘छोटा अमिताभ’ मोठ्या व्यवसायाचा मालक, थेट 300 कोटींची उलाढाल!

(I married Benedict Taylor just to get a visa: Radhika Apte)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.