Pune crime| अंघोळ करताना महिलेचे गुपचूप फोटो काढणारा IB चा सुरक्षा रक्षक अटकेत
महिला आयबीच्या गेस्ट हाऊसमधील आपल्या खोलीत दुपारी आंघोळ करीत होती. यावेळी गेस्ट हाऊसवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या अशोक चव्हाणने बाथरूमच्या खिडकी जवळ गेला. त्यानंतर त्याने फिर्यादीचे खिडकीतून अंघोळ करतानाचे फोटो काढले तसेच अंघोळ करतानाचा व्हिडिओही शूट केला.
पुणे – शहरातील आयबीच्या शासकीय निवासस्थानी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवास्थानामध्ये अंघोळ करणाऱ्या महिलेचे बाथरूमच्या खिडकीतून सुरक्षा रक्षकाने फोटो काढल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फोटो काढणाऱ्या आयबीच्या सुरक्षारक्षकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. अशोक तुकाराम चव्हाण (वय 26 ) असे अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
महिलेला जाणवल्या संशयास्पद हालचाली याबाबत मिळालेली माहिती अशी की घटनेच्या दिवशी फिर्यादी महिला आयबीच्या गेस्ट हाऊसमधील आपल्या खोलीत दुपारी आंघोळ करीत होती. यावेळी गेस्ट हाऊसवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या अशोक चव्हाणने बाथरूमच्या खिडकी जवळ गेला. त्यानंतर त्याने फिर्यादीचे खिडकीतून अंघोळ करतानाचे फोटो काढले तसेच अंघोळ करतानाचा व्हिडिओही शूट केला. मात्र बाथरूमच्या खिडकी बाहेर संबंधित महिलेला काही संशयास्पद हालचाली जाणवल्या, त्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावत आले व त्यांनी आरोपी अशोकला रंगेहात पकडले. लोकांनी त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले.
Atrangi Re | सारा-धनुष-अक्षयचा ‘अतरंगी’ अंदाज, ‘अंतरंगी रे’चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!
साबळेवाडीच्या माजी संरपंचाला पोलिसांचा दणका, पावणे चार कोटींच्या 38 गाड्या मूळ मालकांना परत