बदलला नाही तर आपोआप बदल होईल, भाजप खासदारांना मोदींचा सुचक इशारा, टोपीवरही राजकारण

मोदी पुढं असही म्हणाले-संसदेच्या बैठकांना वेळेवर हजर रहा, नियमीत या, लोकांच्या हिताचं काम करा. नियमानुसार तुमची वेळ आल्यानंतरच बोला. तुमच्या बेशिस्तपणासाठी मी परेशान होणं योग्य नाही होणार.

बदलला नाही तर आपोआप बदल होईल, भाजप खासदारांना मोदींचा सुचक इशारा, टोपीवरही राजकारण
पंतप्रधान मोदींनी गैरहजेरीबाबत भाजप खासदारांना सुचक इशारा दिलाय.
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 10:00 AM

भाजपचेच काय पण इतर पक्षांचेही अनेक खासदार संसदेच्या सभागृहात अनेक वेळेस गैरहजर असतात. काहींची उपस्थिती तर आवश्यक तेवढीच असते. म्हणजे कारवाई होणार नाही याची काळजी घेण्यापुरती. यात सत्ताधारी खासदारांचाही समावेश आहे आणि विरोधीही. त्यावर टाईम टू टाईम चर्चाही केली गेलीय. हाच मुद्दा भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत आला (BJP parliament board meeting). त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या खासदारांना सुचक इशारा देत तिकिटावरच संकट येऊ शकतं असं अप्रत्यक्ष सुचवलं.

नेमकं काय म्हणाले मोदी? पंतप्रधान मोदी म्हणाले- संसदेत कुठल्याही स्थितीत हजर रहा. एखादं विधेयक महत्वाचं मांडलं जाणार असो किंवा नसो. लोकांनी तुम्हाला प्रतिनिधीत्व करण्यासाठी संसदेत पाठवलं आहे. त्यामुळे सभागृहात हजर रहा. एखाद्या लहान लेकराला पुन्हा पुन्हा टोकलं तर त्यालाही ते चांगलं वाटत नाही. तुम्हालाही ते वाटणार नाही. त्यामुळेच स्वत:मध्ये बदल घडवा नाही तर परिवर्तन आपोआप होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी पुढं असही म्हणाले-संसदेच्या बैठकांना वेळेवर हजर रहा, नियमीत या, लोकांच्या हिताचं काम करा. नियमानुसार तुमची वेळ आल्यानंतरच बोला. तुमच्या बेशिस्तपणासाठी मी परेशान होणं योग्य नाही होणार. तुम्हाला लेकरासारखं ट्रिट केलेलं तुम्हालाही नाही आवडणार.

लालटोपी आणि यूपी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्याचा प्रचार सध्या जोरात आहे. गोरखपूरमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावरुन सध्या जोरदार चर्चा झडतेय. समाजवादी पार्टीवर टीका करताना मोदी म्हणाले- लाल टोपीवाल्यांचा (सपाचे नेते लाल टोपी वापरतात) लाल दिव्याच्या गाडीशी संबंध राहिलाय. लाल टोपीवाल्यांना घोटाळे करण्यासाठी, स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी, माफियांना संरक्षण देण्यासाठी, बेकायदेशीर कब्जा करण्यासाठी सत्ता हवीय. मोदी पुढं म्हणाले की, लाल टोपीवाल्यांना सत्ता हवीय ते दहशतवाद्यांवर मेहरबान होण्यासाठी, जेलमधून त्यांना सोडण्यासाठी, लक्षात ठेवा लाल टोपी हाच यूपीसाठी रेड अलर्ट आहे.

हे सुद्धा वाचा: हिवाळ्याच्या हंगामात तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी ‘या’ खास पेयांचा आहारात समावेश करा!

Chanakya Niti | आयुष्यात यशाच्या शोधात असाल तर, 4 गोष्टींविषयी मनात श्रद्धा बाळगा, यश तुमचेच असेल

Switzerland Suicide Machine | एका मिनिटात वेदनेशिवाय मृत्यू, ‘डॉ. डेथ’च्या संशोधनाला कायदेशीर मंजुरी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.