2021च्या सुरुवातीलाच तुमच्या आयुष्यातील ‘हे’ महत्वाचे नियम बदलणार
जानेवारीमध्येच बँकिंग आणि टॅक्स व्यवस्थांशी निगडीत अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. हे नियम आपल्या दैनंदिन आयुष्यावरही प्रभाव टाकणारे असल्यामुळे त्याबाबत आपल्याला माहिती करुन घेणं गरजेचं आहे.
नवी दिल्ली: 2020 ला गुड बाय म्हणतानाच आपल्या 2021 मध्ये होणाऱ्या मोठ्या बदलांना सामोरं जावं लागणार आहे. जानेवारीमध्येच बँकिंग आणि टॅक्स व्यवस्थांशी निगडीत अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. हे नियम आपल्या दैनंदिन आयुष्यावरही प्रभाव टाकणारे असल्यामुळे त्याबाबत आपल्याला माहिती करुन घेणे गरजेचं आहे.(Important rules to change from January 2021)
जीएसटी फायलिंगमध्ये बदल होणार
जे व्यापारी जीएसटी फाईल करतात, त्यांच्यासाठी जीएसटी प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. जानेवारीपासून छोट्या व्यापाऱ्यांना फक्त 4 सेल्स रिटर्न फाईल करावे लागणार आहे. आधी व्यापाऱ्यांना प्रत्येक महिन्याला जीएसटीआर-3बी फाईल करावा लागत होता. पण आता त्याची गरज राहणार नाही. आता व्यापाऱ्यांना प्रत्येक दिन महिन्यांनी जीएसटीआर-3 बी भरावा लागणार आहे. तर 4 जीएसटीआर 1 मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना आता एकूण 8 जीएसटी फाईल करावे लागणार आहेत.
धनादेशाची दोन वेळा तपासणी
रिझर्व बँक ऑफ इंडियाने धनादेशाशी संबंधित नियमांमध्येही बदल केले आहेत. आता RBI कडून 1 जानेवारीपासून पॉझिटिव्ह पे स्टिस्टिम लागू केली जाणार आहे. या आधारे 50 हजाराहून अधिक रकमेच्या व्यवहाराच्या धनादेशाची दोन वेळा तपासणी केली जाणार आहे. एकदा धनादेश दिल्यानंतर मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एसएमएसद्वारे आपल्याला खात्री करुन द्यावी लागणार आहे. त्यात आपल्याला धनादेशाशी निगडीत काही गोष्टी बँकांना पाठवाव्या लागणार आहेत. धनादेशाशी निगडीत होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा बदल केला जाणार आहे.
फास्टॅग बंधनकारक
केंद्र सरकारने 2020 च्या अखेरपर्यंत सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांनुसार आता जुन्या वाहनांनाही फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. आता फास्टॅग 1 जानेवारी 2021 पासून जुन्या गाड्यांना म्हणजे 1 डिसेंबर 2017 पूर्वी विकल्या गेलेल्या चारचाकी वाहनांना सीएमवीआर 1989 मध्ये दुरुस्ती करुन बंधनकारक करण्यात आलं आहे.
डेबिट कार्ड संबंधी नियमांमध्येही बदल
सध्या अनेक बँकांच्या खातेधारकांकडे असे डेबिट आणि क्रेडिट कार्ड आहेत, जे विना पिन नंबर किंवा स्वॅप न करताच व्यवहार होऊ शकतो. असे कार्ड मशीनजवळ घेऊन गेल्यानंतर काही न करताच तुमच्या खात्यातून पैसे कट होतात. आतापर्यंत अशा कार्ड्सना 2 हजारापर्यंतच्या व्यवहाराची परवानगी होती. ती आता 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मोबाईल नंबर 11 अंकी होणार!
दूरसंचार विभागानं जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार आता लॅन्डलाईनवरुन मोबाईल नंबरवर कॉल करण्यासाठीचे नियम बदलण्यात आले आहेत. 15 जानेवारीपासून कुणी लॅन्डलाईनवरुन मोबाईल नंबरवर फोन करत असेल तर त्याला आता मोबाईल नंबर डायल करण्यापूर्वी शून्य दाबावा लागणार आहे.
सर्व सर्व नियम नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीपासूनच बदलणार आहेत. त्यामुळे हे नियम सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.
संबंधित बातम्या:
New Parliament | जगाला हेवा वाटेल अशी मोदींच्या स्वप्नातील संसद! इथं फर्स्ट लूक
Fact Check: आता डिजिटल पेमेंट अॅपच्या वापरासाठी पैसे मोजावे लागणार?
Important rules to change from January 2021