धक्कादायकः 12 वर्षीय मुलाने चोरले सव्वा लाख रुपये, औरंगाबादेत पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही फुटेजने चोरी उघड

सीसीटीव्ही फुटेजमध्ये बारा वर्षीय मुलाने रोकड चोरल्याचे समोर आले. त्यावरून मुदस्सीर यांनी जिन्सी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, सहाय्यक फौजदार हेमंत सुपेकर यांनी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्कादायकः 12 वर्षीय मुलाने चोरले सव्वा लाख रुपये, औरंगाबादेत पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही फुटेजने चोरी उघड
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 12:20 PM

औरंगाबादः शहरातील किराडपुरा येथील पेट्रोल पंपावर एका 12 वर्षीय मुलाने तब्बल सव्वा लाख रुपयांची रोकड पळववल्याचे (Theft by minor boy) उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाने एवढी मोठी चोरी केल्याची घटना उघड झाल्यावर पोलिसही चक्रावून गेले. ही घटना शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमुळे ती उघडकीस (Aurangabad police) आली.

आझाद चौकाजवळील घटना

शहरातील आझाद चौकाजवळील इस्सार पेट्रोल पंपावर मुदस्सीर खान शकील खान हे व्यवस्थापक आहेत. सायंकाळी पाच नंतर पेट्रोल पंपाच्या केबिनमधील काउंटरमध्ये त्यांनी रक्कम जमा केली. त्याचदरम्यान पंपावरील कामगार शेख सलीम शमशोद्दीन यांनी विद्युत मोटर खराब झाल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे मुदस्सीर हे बिघडलेली मोटर दुरुस्तीला टाकण्यासाठी पैठण गेटला गेले. तेथून परत आल्यावर काऊंटरची तपासणी केली असता तेव्हा त्यातील रोख चोरीला गेल्याचे समोर आले.

सीसीटीव्ही फुटेजवरून चोराची ओळख

पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात बारा वर्षीय मुलाने रोकड चोरल्याचे समोर आले. त्यावरून मुदस्सीर यांनी जिन्सी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, सहाय्यक फौजदार हेमंत सुपेकर यांनी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

इतर बातम्या-

राज्यात सारं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, आम्ही जुळवून घेतलंय, तुम्ही दिवस मोजा; शरद पवारांचा थेट इशारा!

औरंगाबादेत हळहळः लग्न तोंडावर, मुलगी पळून गेली, हताश बापाची आत्महत्या, लिहिलं- तिला घरात घेऊ नका…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.