अतिवृष्टीने खरिपही पाण्यात, शेतजमिनीही खरडल्या, मराठवाड्यात 3 लाख हेक्टरवर नुकसान

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे कसे गणितच बिघडते याचा प्रत्यय सध्या मराठवाड्यात (Marathwada) येत आहे. खरिपात कधी पावसाविना उत्पादनात घट होते तर कधी अतिवृष्टीने (Heavy Rain) तोंडचा घास हिसकावला जातो. गेल्या दोन वर्षापासून तर ऐन पिक काढणीच्या प्रसंगीच पावसाचा हाहाकार होत असल्याने खरिपाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही.

अतिवृष्टीने खरिपही पाण्यात, शेतजमिनीही खरडल्या, मराठवाड्यात 3 लाख हेक्टरवर नुकसान
अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील खरिपातील पिके अशी पाण्यात आहेत
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 12:22 PM

लातुर : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे कसे गणितच बिघडते याचा प्रत्यय सध्या मराठवाड्यात (Marathwada) येत आहे. खरिपात कधी पावसाविना उत्पादनात घट होते तर कधी अतिवृष्टीने (Heavy Rain) तोंडचा घास हिसकावला जातो. गेल्या दोन वर्षापासून तर ऐन पिक काढणीच्या प्रसंगीच पावसाचा हाहाकार होत असल्याने खरिपाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. यंदा तर पिक पाण्यात आहेच शिवाय मराठवाड्यातील 145 मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेत जमिनीही खरडून गेल्या आहेत.

उत्पादनाच्या दृष्टीने मराठवाड्यात खरिप हंगामच महत्वाचा मानला जातो. खरिपातील सोयाबीन हे महत्वाचे पिक असून गेल्या चार वर्षापासून मराठवाड्यात कारसाची लागवड घटलेली आहे. बदलत्या बाजारपेठीप्रमाणे शेतकऱ्यांनी शेती व्यवसयात अमुलाग्र बदल केला आहे मात्र, निसर्गाची साथ मिळत नसल्याने मराठवाड्यातील शेती व्यवसाय अडचणीत येत आहे. आठवड्याभरापासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. सरासरीच्या तुलनेत 119 मिमी पाऊस हा जास्तीचा झाला आहे. उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर या जिल्ह्यात अधिकचा पाऊस झाला असून सोयाबीनसह तूर, उडीद ही पिके पाण्यातच आहेत.

उस्माबाद जिल्ह्यातील तब्बल 88 हेक्टरावरील शेतजमिन ही खरडून गेली आहे तर लातुर जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर तालुक्यातील जमिनीही खरडून गेल्या आहेत. 145 मंडळात अतिवृष्टी झाली असून पावसाने आतीपर्यंत 31 जणांचा बळी घेतला आहे. शिवाच घरांतची पडझड आणि जनावरेही दगावलेली आहेत. हंगामाच्या सुरवातीला पावसाअभावी खरिपातील पिके अडचणीत होती. अनेक शेतकऱ्यांनी पिके हातची गेल्याने त्याची मोडणी करून रब्बीसाठी शेत तयार करून ठेवले. आता महिन्याभरावर काढणी आली असतानाच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. (In Marathwada Heavy rains also eroded agricultural land in kharif water)

7 जिल्ह्यातील 145 मंडळात अतिवृष्टी 

मराठवाड्यातील 7 जिल्ह्यातील तब्बल 145 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. काही दिवसांपूर्वी याच मंडळातील पिके ही पाण्याशिवाय गेली होती तर हंगामाच्या शेवटी अतिवृष्टीचा फटका सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 44, जालन्यातील 15, बीडमधील 22, लातुर 7, उस्मानाबाद 1, नांदेड 31 तर परभणी जिल्ह्यातील 26 मंडाळात अतिवृष्टी झाली आहे.

कृषी सिंचनाचा प्रश्न मिटला, पिकांचे अतोनात नुकसान

सर्वदूर झालेल्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. पिण्याच्या पाण्याचाच नाही तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न मिटलेला आहे. मात्र, खरिपातील पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने केलेली मेहनत तर वाया गेलीच आहे शिवाय अथिक फटकाही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

प्रल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

मराठवाड्यातील जायकवाडी आणि मांजरा धरण वगळता इतर लहान- मोठे प्रकल्प भरले आहेत. या प्रकल्पावर अवलंबून अससलेल्या शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. लातुर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या मांजरा धरणाचाही पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

इतरही बातम्या :

शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष, 5 मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित!

खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतं, ईडी कोर्टाचं निरीक्षण

पाझर तलाव फुटला अन् एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....