पुण्यात माथेफिरुकडून जैन मुनींना लोखंडी गजाने मारहाण
पुणे : जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी जैन मुनी पायी प्रवास करत वेगवेगळ्या गावांना भेट देत असतात. मात्र आता याच जैन मुनींना शिरुर तालुक्यातील कवठे गावात एका माथेफिरुने मारहाण केल्याची घटना घडली. माथेफिरुने लोखंडी गजाने मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी शिरुर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून या माथेफिरुचा शोध घेत […]
पुणे : जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी जैन मुनी पायी प्रवास करत वेगवेगळ्या गावांना भेट देत असतात. मात्र आता याच जैन मुनींना शिरुर तालुक्यातील कवठे गावात एका माथेफिरुने मारहाण केल्याची घटना घडली. माथेफिरुने लोखंडी गजाने मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी शिरुर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून या माथेफिरुचा शोध घेत आहेत.
शिरूर येथून सकाळच्या सुमारास शिरूर-भिमाशंकर रोडवरुन मंचरकडे पाच जैन मुनी जात होते. त्यावेळी मुंजाळवाडी कवठे येमाई येथे एका माथेफिरू तरुणाने लोखंडी गजाने जैन मुनींना जबरी मारहाण केली. मात्र त्याला रोखण्यासाठी काही स्थानिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्यस्थी करणाऱ्यां तरुणांवरही या तरुणाने मारहाण केली.
धर्माबरोबर मानवतेचा संदेश देत गावात एक वेगळी विचारधारा घेऊन जाणारे हे जैन मुनी कुणालाही अडथळा ठरत नाहीत. मात्र यांना झालेली मारहाण का, कशासाठी झाली. असा प्रश्न सध्या जैन मुनींनी उपस्थित केला आहे.
माणसात असलेलं माणूसपण जपण्याचा संदेश हे जैन मुनी देत असतात. त्याच संस्कारावर जैन धर्म आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करत असतात. मात्र त्यांना आता मारहाण करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माथेफिरू तरुणाचा शोध पोलीस घेत असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याला अटक करू असे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.
व्हिडीओ : पंकजा-धनंजय मुंडेंची भाऊबंदकी चव्हाट्यावर, भाऊच लावतोय बहिणीवर भ्रष्टाचाराचे आरोप