आयारामांना पदं दिल्याने शिवसेनेत असंतोष, ‘काँग्रेसी भगाव’च्या घोषणा देत राजीनामे

काँग्रेसमधून आलेल्यांना महत्त्वाची पदं दिल्यामुळे शिवसेनेतील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. शिवसेना समन्वयक प्रकाश वाघ यांनी बोलावलेल्या बैठकीत ही  नाराजी स्पष्टपणे दिसली. (Shiv sena meeting Dushyant Chaturvedi)

आयारामांना पदं दिल्याने शिवसेनेत असंतोष, 'काँग्रेसी भगाव'च्या घोषणा देत राजीनामे
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 9:01 AM

नागपूर : काँग्रेसमधून आलेल्यांना महत्त्वाची पदं दिल्यामुळे शिवसेनेतील नाराजी समोर आली आहे. शिवसेना समन्वयक प्रकाश वाघ यांनी बोलावलेल्या बैठकीत ही नाराजी स्पष्टपणे दिसली. निष्ठावंतांना डावलल्यामुळे काँग्रेसधून आलेल्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी करत येथील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहर संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावरसुद्धा जाहीर नाराजी व्यक्त केली. या सर्व घडामोडीमुळे सोमवारी झालेल्या बैठकीत काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.  (in Shiv sena meeting leaders demands to expel the leaders who had come from Congress)

शहरप्रमुखांवर वाशिम, यवतमाळमध्ये पाठवा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना समन्वयकांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे मांडली. पक्षासाठी कित्येक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून प्रमुख पदं दिल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांनतर शहरातील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेसी भगाव’च्या घोषणा देत राजीनामे दिले.

तसेच, यावेळी काँग्रेसमधून आलेल्यांना प्रमुख पदं दिल्यामुळे निष्ठवंतांनी जाहीर नाराजी व्यक्त बैठकीमध्ये ‘काँग्रेसी भगाव’च्या घोषणा दिल्या. या घोषणांमुळे काही काळासाठी तणावही निर्माण झाला होता. शहर संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावरसुद्धा नाराजी व्यक्त करत चतुर्वेदी यांना यवतमाळ किंवा वाशिममध्ये पाठवण्याची मागणी येथील शिवसैनिकांनी केली.

पदवीधरच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत विशेष लक्ष घातलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सन्मानजक जागा न दिल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिलाय. गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी ही निवडणूक लढणार आहे. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या शिवसेनेच्या बैठकीमध्येही अंतर्गत नाराजी दिसून आली. त्यामुळे आगामी काळात महापालिका निवडणुकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असेल.

संबंधित बातम्या :

पदवीधर निवडणुकीचा धसका, फडणवीसांचा नागपुरात आठवड्यातून दोन दिवस मुक्काम; पालिका निवडणुकीची तयारी सुरू

काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्यास नागपुरात स्वबळावर, राष्ट्रवादीचा इशारा

जोशी जाणार, तिवारी येणार, नागपुरात भाजपा काय करणार?

(in Shiv sena meeting leaders demands to expel the leaders who had come from Congress)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.