Euro 2020 : चुरशीच्या सामन्यात शेवटच्या मिनिटांत गोल, नेदरलँड्सचा युक्रेनवर रोमहर्षक विजय
नेदरलँड्सच्या संघाने मागील 11 आंतरराष्ट्रीय सामन्यांत केवळ एकदाच पराभावाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे यूक्रेनच्या संघाला मागील सात सामन्यांमध्ये पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आम्सटरडॅम : रविवारी युरो चषक स्पर्धेत (Euro 2020) झालेला नेदरलँड्स (Netherlands) विरुद्ध युक्रेन (Ukraine) सामना अखेरपर्यंत चुरशीचा राहिला. दोन्ही संघाकडून सामन्यात एकापाठोपाठ एक गोल करण्यात आले. अखेर सामन्याला काही मिनिटं शिल्लक असताना नेदरलँड्सच्या डेंजल डमफ्राइजच्या गोलमुळे सामना 3-2 च्या फरकाने नेदरलँड्सने जिंकला. या विजयासह नेदरलँड्स ग्रुप सी मध्ये तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (In UEFA Euro 2020 Netherlands Beats Ukraine dumfries Goal played Important Role in match)
नेदरलँड्स संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. कारण 2014 च्या विश्वचषकानंतर त्यांना इतक्या मोठ्या स्पर्धेत सहभाग घेता आला नव्हता. दरम्यान पुनरागमनानंतर दमदार सुरुवात केल्याने नेदरलँड्स संघाचे चाहतेही आनंदी असल्याचं दिसून येत आहे.
अखेरच्या मिनिटांत गोल
सामन्यात नेदरलँड्स संघाचा कर्णधार जॉर्जिनियो विहनाल्डमने पहिला गोल करत संघाच खातं खोललं. त्याने 52 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर अवघ्या सात मिनिटांतच वेगहॉर्स्टने आणखी एक गोल करत नेदरलँड्स संघाला सामन्यात 2-0 ने आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर युक्रेनने मुसंडी मारत एंड्री यारमोलेंकोने 75 व्या आणि कर्णधार रोमन यारमचुकने 79 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी केली. ज्यानंतर दोन्ही संघ विजयी गोल करण्यासाठी जीवाचं रान करत होते. सामन्याला अवघी 5 मिनिटं शिल्लक असताना नेदरलँड्सच्या डेंजल डमफ्राइजने एक उत्कृष्ट हेडर घेत गोल केला. या गोलमुळे सामन्यात नेदरलँड्सने 3-2 च्या फरकाने विजय मिळवला.
MATCH REPORT: Dutch shrug off late comeback to open with dramatic win in Amsterdam ? #EURO2020
— UEFA EURO 2020 (@EURO2020) June 13, 2021
पुढील सामने
यानंतर नेदरलँड्सचा पुढील सामना गुरुवारी ऑस्ट्रियासोबत असेल. विशेष म्हणजे दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकला आहे. तर युक्रेनचा सामना नॉर्थ मेसेडोनिया संघासोबत असेल.
हे ही वाचा :
Euro 2020 : इंग्लंडची क्रोएशियावर मात, ऑस्ट्रियाचाही जबरदस्त विजय
Euro 2020: फिनलँडचा ऐतिहासिक विजय, वेल्स आणि स्वित्झर्लंडमधील सामना अनिर्णीत, बेल्जियमची रशियावर मात
(In UEFA Euro 2020 Netherlands Beats Ukraine dumfries Goal played Important Role in match)