…म्हणून उडदाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनो मालाची काळजी घ्या अन् योग्य दर मिळवा

काही भागांमध्ये उडदाची काढणी झाली आहे तर काही भागात ही कामे सुरु आहेत. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने उडदाचे दर वाढत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमध्ये दर हे वाढत आहेत. त्यामुळे काढणी झालेल्या उडदाची योग्य कळजी घेतली तर शेतकऱ्यांना सुधारित दर मिळणार आहे. 3000 पासून 8000 पर्यंत उडदाला दर मिळत आहेत.

...म्हणून उडदाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनो मालाची काळजी घ्या अन् योग्य दर मिळवा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 10:36 AM

लातूर : खरीपातील मुख्य पीक असलेले सोयाबीन अजूनही पाण्यातच आहे. शेतकरी काढणीचे प्रयत्न करीत आहे पण सबंध शेतामध्ये पाणी साचल्याने प्रयत्नांची पराकष्टा करावी लागत आहे. खरीपातील केवळ उडीद पीकाने शेतकऱ्यांना तारलेले आहे. काही भागांमध्ये उडदाची काढणी झाली आहे तर काही भागात काढणी कामे ही सुरु आहेत. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने उडदाचे दर वाढत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमध्ये दर हे वाढत आहेत. त्यामुळे काढणी झालेल्या उडदाची योग्य कळजी घेतली तर शेतकऱ्यांना सुधारित दर मिळणार आहे. 3000 पासून 8000 पर्यंत उडदाला दर मिळत आहेत.

उडीद उत्पादक राज्यांत मध्यंतरी जोरदार पाऊस झाला. त्याचा परिणाम पिकाच्या गुणवत्तेवर झाला आहे. पावसामुळे उडीद हे डागाळलेले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात बाजारात आवक होणाऱ्या उडदामध्ये डागी माल हा अडचणीचा मुद्दा ठरत आहे. तसेच उडदाची मागणीही वाढत आहे. त्यामुळे दिल्ली बाजारात उडदाच्या दरात 25 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात उडदाचे दर 6100 ते 7200 रुपयांदरम्यान होते.

महाराष्ट्रातील बाजार समित्यांत चालू सप्ताहात उडदाच्या दरात तेजी-मंदीचा अभाव होता. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला 7000 पर्यंत दर मिळाला आहे. आवक कमी असली तरी दाखल होणाऱ्या उडदाला चांगला दर मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सोयाबनची कसर उडदाने काढली भरुन

दरवर्षी खरीपात सोयाबनच्या दरावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असते. यंदा मात्र, सोयाबीनचे दर हे घसरलेले आहेत. तर उडदाला चांगला दर मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सोयाबीनच्या आगोदर काढणी झालेल्या उडदाने शेकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. शिवाय बाजारपेठेत उडदाची आवक सुरु झाल्यापासून दर हे स्थिर आहेत. तर दुसरीकडे सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण सुरु आहे.

अशी घ्या काढणी झालेल्या पीकाची काळजी

* ज्या उडदाची काढणी ही पावसाच्या अगोदर झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी पीक साठवणूकीला हरकत नाही. जर उडीद डागाळलेला नाही त्याची साठवणूक केली तरी त्याच्या गुणवत्तेवर काही परिणाम हा होणार नाही. शिवाय भविष्यात दर वाढले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

* पीक साठवूण ठेवण्याची शेतकऱ्यांची क्षमता ही अधिक नसते. त्यामुळे पावसात भिजलेल्या उडदाची विक्री ही मिळेल त्या दरात करणे हेच शेतकऱ्यांच्या हीताचे राहणार आहे.

*वेअर हाऊस एक उत्तम पर्याय…शेती मालाची साठवणूक करण्यासाठी आता वेअर हाऊस उभारण्यात आलेली आहेत. शेतीमालाच्या साठवणूकीवर सध्याच्या दरानुसार शेतकऱ्यांना 75 टक्के रक्कम ही अदा केली जाते. त्यामुळे योग्य वेळी शेतीमालाला योग्य दर मिळणार आहे. तर धान्याचे नुकसानही होणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच बुलढाणा अर्बनचे वेअर हाऊस आहेत. त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे.

*कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वेअर हाऊसची उभारणी करण्यात आलेली आहे. शिवाय येथे शेतीमालाची साठवणूक केल्यावर या मालावर शेतकऱ्यांना कर्जही मिळते. आणि योग्य भाव झाल्यात त्याची विक्री केली जाते. यामुळे मिळालेल्या पैशाच्या जोरावर शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येणार आहे. (Increase in urad prices, proper care taken if farmers benefit more)

संबंधित बातम्या :

छत्तीसगडच्या शेतकऱ्याने नापीक जमिनीत आणली हिरवळ, आज 500 लोकांना रोजगार

तूर लागवडीत महाराष्ट्र आघाडीवर, काय तूराचे फायदे अन् लागवड प्रक्रीया जाणून घ्या..

राजकीय स्वार्थासाठी कृषी कायद्याला विरोध, पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले खडे बोल

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.