नवाब मलिक यांच्या जावयाच्या अडचणींमध्ये वाढ, 18 जानेवारीपर्यंत NCB कस्टडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये 200 किलो ड्रग्स जप्त केल्याप्रकरणी जावई समीर खान 18 जानेवारीपर्यंत एनसीबीने कस्टडी सुनावली आहे. बुधवारीच, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) त्यांना अटक केली होती. समीर खान यांना एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. तब्बल 10 तासांच्या सखोल […]

नवाब मलिक यांच्या जावयाच्या अडचणींमध्ये वाढ, 18 जानेवारीपर्यंत NCB कस्टडी
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 3:45 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये 200 किलो ड्रग्स जप्त केल्याप्रकरणी जावई समीर खान 18 जानेवारीपर्यंत एनसीबीने कस्टडी सुनावली आहे. बुधवारीच, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) त्यांना अटक केली होती. समीर खान यांना एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. तब्बल 10 तासांच्या सखोल चौकशीनंतर एनसीबीने त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील चौकशीसाठी पुढचे चार दिवस ते कस्टडीमध्ये असणार आहेत. नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. (Increased difficulties in Nawab Malik Son in law sameer khan will be in NCB custody till 18 January )

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये ब्रिटिश नागरिक असलेल्या करण सजनानी आणि राहिला फर्नीचरवाला या दोघांना 2 दिवसाची NCB कस्टडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय महत्त्वाचे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, मुंबईचे एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने मुंबईच्या वांद्रे पश्चिम इथल्या एका कुरिअरकडून गांजा ताब्यात घेतला होता. यानंतर पुढच्या कारवाईमध्ये खार इथल्या करण सजनानी यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. त्यामुळे करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, शाइस्ता फर्निचरवाला आणि राम कुमार तिवारी यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळीच तपासादरम्यान वांद्रे इथल्या रहिवासी समीर खानचं नाव समोर आलं. यानंतर त्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.

मंगळवारी या सगळ्या प्रकरणात एनसीबीने मुंबईचे मुच्छड पानवाला राम कुमार तिवारी यांना अटक केली. याआधी सोमवारी एनसीबीने मुच्छड पानवाला, जयशंकर तिवारी आणि रामकुमार तिवारी यांच्या मालकांची अनेक तास चौकशी केली. रामकुमार तिवारी हा जयशंकर तिवारीचा धाकटा भाऊ असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मुच्छड पानवाला हा जामिनावर सुटला आहे. 15 हजारांच्या वैयक्तिक बाँडवर बुधवारी मुंबईच्या विशेष कोर्टाने मुच्छड पानवाला यांना जामीन मंजूर केला.

कोर्टात काय बोलला करण सजनानी ?

ज्याला गांजा समजलं जात आहे. ती एक सेंद्रिय सिगारेट असल्याचं करण सजनानी यांना कोर्टात म्हणटलं आहे. मी ते ऑनलाइन विकतो. हे सेंद्रीय सिगारेट आहे. ते गुलाबाच्या पाकळ्या आणि पानांपासून बनवलं जातं. ते गांज्यासारखं दिसतं पण ते गांजा नसल्याचंही त्यांनी कोर्टात म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने कुरिअरमधून जप्त केलेला गांजा हा करण सजनानी यांनीच मुंबई वगळता इतर अनेक राज्यांतील ग्राहकांना पाठवला होता. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासावेळी बॉलिवूडमधलं ड्रग्स प्रकरण समोर आलं. या प्रकरणात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग यांच्यासह अनेक सिनेस्टार एनसीबीच्या भोवऱ्यात होते.

समीर खान यांचा करण सजनानीसोबत व्यवहार

ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं.

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे. (Increased difficulties in Nawab Malik Son in law sameer khan will be in NCB custody till 18 January )

संबंधित बातम्या – 

नवाब मलिक यांच्या जावयाकडून ड्रग्ज सेवन, आमच्याकडे पुरावे, एनसीबी अधिकाऱ्याचा दावा

हसत हसत कडक इशारा, शरद पवार धनंजय मुंडेंवर कारवाई करणारच?

(Increased difficulties in Nawab Malik Son in law sameer khan will be in NCB custody till 18 January )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.