Ind vs Aus : मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका, संतापलेल्या कप्तान रहाणेने सामना रोखला
सिडनी कसोटीच्या चौथ्या दिवशीदेखील काही ऑस्ट्रेलियन समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केली.

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात (Aus vs Ind 3rd Test) तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात खेळाडू एकमेकांना डिवचतात. यामध्ये काहीवेळा हे खेळाडू शिवीगाळही करतात. मात्र आता क्रिकेट सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडून शिवीगाळ तसेच वर्णद्वेषी टीका (Racial Abuse) करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या दोघांना काल (शनिवारी – सामन्याच्या तिसऱ्या दिवशी) शिव्या दिल्या असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या सर्व प्रकरणाबाबत टीम इंडियाकडून सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण आज सामन्याच्या चौथ्या दिवशीदेखील काही ऑस्ट्रेलियन समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केली. परंतु यावेळी कप्तान अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) शांत बसला नाही. सिराजने तक्रार करताच कर्णधार रहाणेने याबाबतची पंचांकडे तक्रर केलीच सोबतच सामनादेखील थांबवला. कर्णधार रहाणेने घेतलेल्या भूमिकेनंतर पंच आणि पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पंचांनी पोलिसांच्या मदतीने सिराजवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी करण्यात आली. (Ind vs Aus : Mohmmad Siraj Racially abused by australian crowd again match resumes after abusers moved)
रहाणेने सामना रोखला
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुसऱ्या सत्रात शेवटचं षटक टाकण्यास सुरुवात करत होता. त्यादरम्यान सिराज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी सिराजच्या मागे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी सिराजवर कमेंट्स करणं सरु केलं. तेव्हा कप्तान रहाणेने बुमराहला गोलंदाजी करण्यापासून रोखले. त्यानंतर रहाणेने सिराजशी बातचित केली आणि थेट पंचांना गाठून त्यांच्याकडे तक्रार केली. यादरम्यान संपूर्ण भारतीय संघ खेळपट्टीजवळ एकत्र जमला. त्यानंतर पंचांनी आणि पोलिसांनी स्टँडमध्ये जाऊन संबंधित प्रेक्षकांना स्टेडियमधून बाहेर जाण्यास सांगितले. यादरम्यान भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्येदेखील नाराजी दिसत होती. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील टीम सिक्युरिटीशी बातचित केली.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी काय घडलं होतं?
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एक क्रिकेट चाहता हा सामना पाहायला आलेला. हा चाहता दारु पिऊन आला होता. या मद्यधुंद चाहत्याने शिवीगाळ केली. या चाहत्याने मोहम्मद सिराजला माकड म्हटल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. तसेच बुमराह आणि सिराजला शिवीगाळ केल्याचं प्रकारही समोर आला. या सर्व प्रकारानंतर टीम इंडियाने सामनाधिकारी डेव्ही बून यांच्याकडे तक्रार करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अश्विनसह इतर खेळाडूंनी फिल्ड अंपायर यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शिवीगाळ केल्याचं सांगितले गेलं. यानंतर अंपायर आणि संबंधित यंत्रणेने बुमराह आणि सिराजसोबत चर्चा केली. तसेच टीम इंडियाच्या सिक्युरिटी संबंधित अधिकाऱ्यांनी मैदानातील सुरक्षा कर्मियांना याबाबत विचारणा केली. यावेळेस आयसीसीचे सुरक्षाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान हा सर्व प्रकार आयसीसीपर्यंत पोहचला आहे.
पाहा नेमकं काय झालं
Australian Fans Were Asked To Leave The Stadium During India-Australia 3rd Test Match At Sydney Cricket Stadium,#SCG For Creating Inappropriateness By Commenting On Mohammad Siraj Right After He Finished His Bowling & Was Arriving To Field Near The Boundaries pic.twitter.com/YgLRc1WdrB
— Prithvi.v.Bharadwaj (@PrithviMatka) January 10, 2021
मंकीगेट प्रकरण चर्चेत
यासर्व प्रकरणामुळे 2008 मधील मंकीगेट प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे मंकीगेट प्रकरणही सिडनीतच घडलं होतं. यावेळेस ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सामना खेळला जात होता. ऑस्ट्रेलियाकडून अँड्रयू सायमंड फलंदाजी तर हरभजन सिंह गोलंदाजी करत होता. गोलंदाजीदरम्यान ने हरभजनने माझा 4-5 वेळा (Monkey) माकड असा उल्लेख केला, असा आरोप सायमंडने केला होता. यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. यामुळे हरभजनवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.
हेही वाचा
मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा जायबंदी, कसोटी की दुखापतीची मालिका?
रवींद्र जाडेजाची चपळाई टीम इंडियाच्याच अंगाशी, 13 वेळा साथीदार रनआऊट
(Ind vs Aus : Mohmmad Siraj Racially abused by australian crowd again match resumes after abusers moved)