नवी दिल्ली : देशात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (India Corona Update). गेल्या 24 तासात 1543 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 29,435 वर पोहोचला आहे. यापैकी 6,865 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर देशात सध्या 21,631 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते (India Corona Update).
With 1543 new cases in the last 24 hours, the total COVID19 positive cases in the country are now 29,435. 684 patients have been found cured, in the last 24 hours; our recovery rate is now 23.3%. This is a progressive increase in recovery rate:Lav Agrawal,Jt Secy,Health Ministry pic.twitter.com/V3dc1c4S9f
— ANI (@ANI) April 28, 2020
देशात गेल्या 24 तासात 684 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचं प्रमाणदेखील वाढत आहे. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट हा 23.3 टक्क्यांवर पोहोचला आहे, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं. दरम्यान, कोरोनावर अद्यापही विशिष्ट असं औषध निघालेलं नाही. मात्र, प्लाझमा थेरपी संदर्भात संशोधन सुरु आहे, असंदेखील अग्रवाल यांनी सांगितलं.
दरम्यान, केंद्र सरकारच्या पथकाने गुजरातमधील सुरत आणि अहमदाबाद शहरांमध्ये जाऊन पाहणी केली. तेथील स्थलांतरित मजुरांना रेशन दिलं जात आहे. मजुरांना अन्नधान्य मिळावं यासाठी अनेक सामाजिक संस्था एकवटल्या आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. त्याचबरोबर सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केलं जात असल्याची माहिती देखील श्रीवास्तव यांनी दिली.
IMCT (which is visiting Surat) found that the administration is conducting extensive testing so that COVID positive cases are identified in the initial stages itself: Punya Salila Srivastava, Joint Secretary (MHA) #COVID19 pic.twitter.com/sNqWHARHfY
— ANI (@ANI) April 28, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळपर्यंत अंदमान-निकोबार येथे 33 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश राज्यात मंगळवार सकाळपर्यंत 1183 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 235 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 31 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. आसासममध्ये आज सकाळपर्यंत 36 रुग्ण आढळले होते. यापैकी 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे.
State-wise details of Total Confirmed #COVID19 cases
(till 28 April, 2020, 08:00 AM)➡️States with 1-36 confirmed cases
➡️States with 37-500 confirmed cases
➡️States with 500+ confirmed cases
➡️Total no. of confirmed cases so farVia @MoHFW_INDIA pic.twitter.com/7GZH5p2oXL
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) April 28, 2020
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?
पिंपरी चिंचवडमध्ये शंभरीपार कोरोनाग्रस्त, रुपीनगरमध्ये 9 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?
मालेगावात आणखी 36 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, 9 वर्षाच्या मुलाचाही समावेश
नागपूरचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरात 450 जण क्वारंटाईन, कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच