Haj Yatra 2020 | यंदा भारतीयांना हज यात्रेची संधी नाही, फक्त सौदीतील यात्रेकरुंना परवानगी

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा केवळ सौदी अरेबियामध्ये  राहणाऱ्यांनाच हज यात्रा करता येणार (Haj Yatra 2020) आहे.

Haj Yatra 2020 | यंदा भारतीयांना हज यात्रेची संधी नाही, फक्त सौदीतील यात्रेकरुंना परवानगी
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 6:58 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा केवळ सौदी अरेबियामध्ये  राहणाऱ्यांनाच हज यात्रा करता येणार आहे. भारतीयांना हज यात्रेवर पाठवलं जाणार नाही. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून हज यात्रा रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्यानंतर आता हा बदल करण्यात आला आहे. (Haj Yatra 2020 India not send Haj pilgrims to Saudi Arabia)

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सौदी अरेबियाच्या हज मंत्र्यांनी नकवी यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हज यात्रा ही परदेशींसाठी रद्द करत आहोत. त्यामुळे यंदा भारतातून हज यात्रेस येणाऱ्या यात्रेकऱ्यांना पाठवू नये, अशी सूचना केली होती.

त्यांची ही सूचना पाळत 2020 च्या हज यात्रेसाठी भारतीयांना सौदी अरबियाला जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोेशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन व्हावे, यासाठी हा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे.

दरम्यान यंदाच्या हज यात्रेसाठी जवळपास 2 लाख 13 हजार लोकांनी अर्ज केले होते. या सर्वांना त्यांचे संपूर्ण पैसे तात्काळ बँक खात्यात परत देण्यात येतील, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आज पासून पैसे परत देण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हज यात्रेसाठी अर्ज केलेल्या सर्वांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील, असेही केंद्र सरकारने सांगितले आहे.

गेल्यावर्षी जवळपास 2 लाख भारतीय या हज यात्रेत सहभागी झाले होते. ज्यात 50 टक्के महिलांचा समावेश होता. (Haj Yatra 2020 India not send Haj pilgrims to Saudi Arabia)

संबंधित बातम्या : 

Made In China | चिनी वस्तू इतक्या स्वस्त कशा? कॉपीकॅट चीनच्या बनवेगिरीची कहाणी

पतंजलीकडून कोरोनावरील Coronil औषध लाँच, 7 दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.