बेरोजगारीचे प्रमाण वाढवण्यासाठी विरोधकांकडून मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू होता. पण या सगळ्यात नुकत्याच समोर आलेली आकडेवारीनुसार ही सरकारच्या बाजूने आहे.
भारतात बेरोजगारीचे प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनादरम्यान, भारतात जूनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 10.18 टक्के होते, ते आता नोव्हेंबरमध्ये 6.51 टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे.
कोरोना संकटातही असूनही एप्रिल-जून दरम्यान तीन आयटी कंपन्यांनी केली 41000 हायरिंग
कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 23.52 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2020 मध्ये तर ही आकडेवारी सर्वाधिक होती. यानंतर कृषी क्षेत्रात झालेल्या सुधारणेमुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात बेरोजगारीचं प्रमाण कमी होऊ लागल्याचं दिसून आलं.
भारतात ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 6.98 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 6.67 टक्के होता. देशातील ग्रामीण बेरोजगारीच्या दराविषयी सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये हा दर 6.90 टक्के होता तर नोव्हेंबरमध्ये 6.26 टक्क्यांवर घसरला.
Government Jobs 2021
यानंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथं बेरोजगारीचा दर 18.6 टक्के आहे. यानंतर गोवा 15.9 %, त्यानंतर हिमाचल प्रदेश 13.8 %, त्रिपुरा 13.1 %, पश्चिम बंगाल 11.2 % आणि बिहार बेरोजगारी दर 10% आहे.