IND vs WI | भारताचा एक प्लेयर वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात भारी पडणार, सिलेक्टर्सना त्याला निवडावच लागेल
IND vs WI : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया येत्या 27 जुलैपासून वेस्ट इंडिज विरुद्ध 3 वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्या दृष्टीने ही सीरीज महत्वाची आहे.
नवी दिल्ली : टीम इंडिया पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. 27 जुलैपासून वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीज सुरु होणार आहे. वनडे सीरीजमध्ये तीन सामने खेळले जाणार आहेत. भारतात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. आगामी वनडे वर्ल्ड कप लक्षात घेता टीम इंडियासाठी प्रत्येक वनडे सामना महत्वाचा आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे सीरीजमध्ये रोहित शर्मा टीमचा नेतृत्व करताना दिसू शकतो. भारताकडे असा एक खेळाडू आहे, जो वेस्ट इंडिजमध्ये धुमाकूळ घालू शकतो.
टीम इंडियाच्या सिलेक्टर्सना या खेळाडूला निवडावच लागेल. कारण यामुळे टीम इंडियाची फक्त ताकतच वाढणार नाही, तर बॅटिंग-बॉलिंग दोन्ही ठिकाणी ऑप्शन मिळतील.
टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यात किती सामने खेळणार?
भारत-वेस्ट इंडिजमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सीरीजमधील पहिला सामना 27 जुलैला होईल. संध्याकाळी 7 वाजता बारबाडोसमध्ये मॅच सुरु होईल. 12 जुलैपासून टीम इंडियाच्या सामन्यांना सुरुवात होईल. वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना होईल. टीम इंडिया या दौऱ्यात 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 T20 सामने खेळणार आहे.
टीम इंडियाच्या या खेळाडूच नाव काय?
भारत-वेस्ट इंडिजमधील पहिल्या वनडे सामन्यात एक खेळाडू कॅप्टन रोहित शर्मासाठी महत्वाच अस्त्र ठरु शकतो. या खेळाडूमुळे वेस्ट इंडिजची चिंता नक्कीच वाढेल. हा खेळाडू मॅचची दिशा बदलू शकतो. हा खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजीत माहीर आहे. टीम इंडियाच्या या ऑलराऊंडर प्लेयरच नाव शार्दुल ठाकूर आहे. शार्दुल ठाकूरकडे वेगाशिवाय स्विंग सुद्धा आहे. शार्दुल वेळेला फटकेबाजी सुद्धा करु शकतो. लोअर ऑर्डरमध्ये घातक बॅट्समन
सिलेक्टर्सना वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये या खेळाडूला निवडावच लागेल. पहिल्या वनडेमध्ये शार्दुल ठाकूर वेस्ट इंडिजला भारी पडू शकतो. शार्दुल ठाकूरमुळे टीम इंडियाला ऑलराऊंडरचा ऑप्शन मिळतो. शार्दुलकडे बॅट आणि बॉल दोघांनी सरस कामगिरी करण्याची क्षमता आहे. शार्दुल ठाकूर लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंगला येतो. हार्दिक पांड्यासोबत प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या समावेशमुळे टीम इंडियाची ताकत आणखी वाढेल.