माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. या सर्व वादावर इंदुरीकरांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे (Indurikar Maharaj controversy).

माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज
Follow us
| Updated on: Feb 16, 2020 | 5:53 PM

बीड : “माझे सध्या वाईट दिवस आहेत. चांगलं काम करताना एवढा त्रास होतो. या विषयावर आता मला काहीच बोलायचं नाही”, असं मत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केलं. इंदुरीकरांचं आज दुपारी बीड जिल्ह्यातील कड्याजवळच्या कुंभारवाडीत कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं (Indurikar Maharaj controversy). या कीर्तनात बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली.

बीडच्या कड्याजवळ कुंभारवाडीत कीर्तनाला येताना इंदुरीकर महाराजांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी काही लोकांच्या हातात ‘आय सपोर्ट इंदुरीकर’, ‘महाराज आम्ही तुमच्यासोबत आहोत’ अशा आशयाचे फलकदेखील होते.

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. या सर्व वादावर इंदुरीकरांनी शुक्रवारी रात्री (14 फेब्रुवारी) एका कीर्तनात प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा बीडमध्ये या प्रकरणावर भाष्य केलं.

इंदुरीकर महाराजांनी याअगोदर काय स्पष्टीकरण दिलं होतं?

यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. आज इंदुरीकर संपवायला निघालेत. पण मी बोलतोय हे खरंच आहे. मी कशात सापडेना म्हणून मला गुतवण्याचा(अडकवण्याचा) प्रयत्न सुरु आहे. मी तर आता या मुद्द्यावर आलो आहे की, एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा, आता लय झालं, फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कपॅसिटी संपली. 26 वर्षे झाली मालक- बायका नाही, पोरगं नाही, रात्रं-दिवस प्रवास कष्ट, कष्ट, कष्ट, कष्ट लोकांसाठी करायचं. दोन-अडीच तासाच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं गेलं, पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही बी.

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेऊन द्या पहिलं. आणि चारी बाजूला….. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो..

आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचं, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. बस्स.. आता नको मजा नाही राहिली.

एवढंच जर आपल्यासारख्याला त्रास होत असेल, साधा त्रास.. काड्या करणारी मंडळी ही यूट्यूबवाली मंडळी. यांनीच इंदुरीकरच संपवावा..त्यांना माहीत नाही, यूट्यूब संपेल. यूट्यूबवाल्यांना इंदुरीकराच्या नावाने पैसा मिळाला मोक्कार. मी काय या यूट्यूबचा एक रुपयाही घेतला नाही. ही यूट्यूबवाली मंडळी झाली कोट्याधीश. एक एक लाख लाईक आहेत. पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय. पाहाणाऱ्यांची संख्या खूप आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.