AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 | आयपीएलच्या आगामी हंगामात वाढीव संघाच्या निर्णायाचं ‘द वॉल’ राहुल द्रविडकडून स्वागत, म्हणाला…..

आयपीएलच्या आगामी हंगामाला नेहमीप्रमाणे वेळेतच सुरुवात होईल, असा आशावाद काही दिवंसापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केला होता.

IPL 2021 | आयपीएलच्या आगामी हंगामात वाढीव संघाच्या निर्णायाचं 'द वॉल' राहुल द्रविडकडून स्वागत, म्हणाला.....
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 1:00 AM

मुंबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) मुंबई इंडियन्सनी (Muambai Indians) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings)अंतिम सामन्यात विजय मिळवला. यासह मुंबईने पाचव्यांदा विजेतपद पटकावलं. आयपीएलच्या या 13 व्या मोसमाला कोरोनामुळे 5 महिन्यांच्या विलंबाने सुरुवात झाली. मात्र कोरोनावर लस सापडल्यास आयपीएलचा आगामी हंगाम वेळेत सुरु होईल, अशा आशावाद बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Bcci President Sourav Ganguly) काही दिवसांपूर्वी व्यक्त केला. यातच बीसीसाआय आयपीएलच्या 14 व्या हंगामात नव्याने 2-3 संघांना जोडण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. या निर्णयाचा आयपीएलमधील फ्रंचायजींनी विरोध केला आहे. मात्र टीम इंडियाचा ‘द वॉल’ म्हणजेच राहुल द्रविडने बीसीसीआयच्या या निर्णायचं स्वागत केलं आहे. IPL 2021 Rahul Dravid welcomes the decision of the increased team in the upcoming IPL season, said

द्रविड काय म्हणाला?

“आयपीएल स्पर्धेमुळे आतापर्यंत अनेक युवा खेळांडूना संधी मिळाली आहे. आयपीएलमुळे युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालंय. मात्र असेही काही खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्येही संधी मिळत नाही. त्यामुळे युवा खेळाडूंच्या दृष्टीने पाहता संघवाढीचा निर्णय योग्य असल्याचं द्रविड म्हणाला”. राजस्थान रॉयल्सचे सहमालक मनोज बदाले यांच्या पुस्तकाचं ऑनलाईन प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस द्रविडने हे वक्तव्य केलं. याबाबतचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. द्रविड पुढे म्हणाला की, “युवा खेळाडूंमध्ये असलेली प्रतिभा पाहता आयपीएल संघ वाढीसाठी तयार आहे. तसेच दररोज प्रतिभावान उदयनमुख खेळाडू समोर येत आहेत.”

मनोज बदालेंकडून समर्थन

मनोज बदालेंनीही या निर्णायचं स्वागत केलंय. “मात्र असं करताना या स्पर्धेच्या दर्ज्याला बाधा निर्माण होणार नाही, याबाबतही त्यांनी लक्ष वेधून घेतलं. तसेच संघ वाढल्यास बहुतेक सामने हे दुपारी खेळवावे लागतील”, असं बदाले म्हणाले.

दिवाळीनंतर नव्या संघांसाठी निविदा काढणार?

बीसीसीआय (BCCI) आयपीएलमध्ये आणखी दोन नवे संघ समाविष्ट करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी BCCI दिवाळीनंतर निविदा काढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएलमध्ये नव्या संघांचा समावेश झाला तर खेळाडूंचा मोठा लिलाव होईल.

प्लेईंग इलेव्हनमध्ये 5 परदेशी खेळाडू?

आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येक संघाला नियमांनुसार अंतिम 11 खेळांडूंमध्ये फक्त 4 खेळाडूंनाच खेळवता येत. मात्र हा आकडा 4 वरुन 5 करण्याची लगबगक सुरु असल्याची माहिती मिळतेय. मात्र याबाबत अजूनही कोणतीच खात्रीशीर किंवा औपचारिक माहिती मिळाली नाहीये.

संघवाढीला विद्यमान फ्रँचायझीचा विरोध

आयपीएलमध्ये आता एकूण 8 फ्रँचायझी आहेत. या फ्रँचायझींचा नव्याने संघ वाढीच्या निर्णायाला विरोध आहे. नवीन संघ आल्यास संबंधित फ्रँचायझीला आपल्या ताफ्यातील खेळाडू बदलावे लागतील, अशी भिती फ्रँचायझीकडून व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे संतुलीत असलेल्या संघाचं संतुलन बिघडण्याची भितीही फ्रँचायझीला वाटतेय.

संबंधित बातम्या :

IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.