IPL 2022 Purple Cap: उमेश यादवला मागे टाकत नटराजन दुसऱ्या स्थानी, चहलच्या वर्चस्वाला धोका

आयपीएल 2022 (IPL 2022) चा थरार प्रत्येक सामन्यासोबत वाढत आहे. 10 संघ आणि बदललेले स्वरूप यामुळे लीग अधिक मनोरंजक बनली आहे. प्रत्येक सामन्यासह गुणतालिकेत चढ-उतार पाहायला मिळत आहेत, तर पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपचे दावेदारही दररोज बदलत आहेत.

IPL 2022 Purple Cap: उमेश यादवला मागे टाकत नटराजन दुसऱ्या स्थानी, चहलच्या वर्चस्वाला धोका
T NatarajanImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 12:17 PM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) चा थरार प्रत्येक सामन्यासोबत वाढत आहे. 10 संघ आणि बदललेले स्वरूप यामुळे लीग अधिक मनोरंजक बनली आहे. प्रत्येक सामन्यासह गुणतालिकेत चढ-उतार पाहायला मिळत आहेत, तर पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपचे दावेदारही दररोज बदलत आहेत. शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला, त्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठे बदल पाहायला मिळाले. या सामन्यानंतर युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) खुर्चीवरचा धोका वाढला आहे. त्याच्यासमोर निर्माण झालेल्या नव्या धोक्याचे नाव आहे टी नटराजन (T Natarajan). पर्पल कॅपच्या शर्यतीत नटराजन आता दुसऱ्या स्थानी आहे.

आयपीएलमध्ये शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. या सामन्यासह हैदराबादने विजयाची हॅट्ट्रिक केली. संघाच्या या विजयात गोलंदाजांनी विशेष भूमिका बजावली. उमरान मलिकने दोन आणि टी नटराजनने तीन बळी घेतले. नटराजनने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या टॉप 5 मध्ये एंट्री घेतली आहे.

नटराजन दुसऱ्या स्थानी

टी नटराजनने या सामन्यात आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 37 धावांत तीन बळी घेतले. नटराजनने चौथ्या षटकात व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायणला बाद केले. त्यानंतर खेळपट्टीवर चिकटून बसलेल्या आणि चौफेर फटकेबाजी करत असलेल्या नितीश राणाला बाद करून नटराजनने संघाला मोठे यश मिळवून दिले. या सामन्यापूर्वी नटराजनच्या नावावर चार सामन्यांत 8 विकेट्स होत्या. मात्र, आता तीन विकेट घेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेश यादवला मागे टाकत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. केकेआरच्या उमेशने या सामन्यात एकही विकेट घेतली नाही आणि त्यामुळेच तो मागे पडला. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल 5 सामन्यात 12 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे.

IPL 2022 Purple Cap

IPL 2022 Purple Cap

पर्पल कॅप कोणाला दिली जाते?

पर्पल कॅपच्या शर्यतीत दरवर्षी अनेक नवीन आणि काही दिग्गज गोलंदाजांची नावं पाहायला मिळतात. जसजशी लीग पुढे सरकत जाईल तसतशी ही शर्यत अतिशय रोमांचक होत जाते. आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याबरोबरच ही कॅप पटकावण्याचे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. हंगामाच्या शेवटी, यादीत शीर्षस्थानी असलेल्या गोलंदाजाला पर्पल कॅप पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर, लीगदरम्यान प्रत्येक सामन्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेला गोलंदाज हा त्याचा हक्कदार मानला जातो. यंदा लीगमध्ये 8 ऐवजी 10 संघ भाग घेत आहेत, त्यामुळे पर्पल कॅपची शर्यत आणखी कठीण आणि रोमांचक बनली आहे. त्याचबरोबर अनेक नवीन नावेही या शर्यतीत सामील झाली आहेत.

इतर बातम्या

IPL 2022 DC vs RCB Live Streaming: जाणून घ्या दिल्ली विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, MI vs LSG : आज लखनौ मुंबईला रोखणार?, की इंडियन्सची विजयाची भूक यश खेचून नेणार?

IPL 2022, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवेळा पराभव, आज विजयश्री खेचून आणण्याची संधी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.